Tarun Bharat

बाळासाहेब थोरातांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई\ ऑनलाईन टीम

मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवस्थानी राजकीय नेत्यांच्या भेटींचा सिलसिला सुरूच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या आठवड्याभरात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भातील माहिती ट्वीट करत दिली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.खासदार शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शरद पवारांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी सत्ताधारी मित्रपक्षातील नेते आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचले होते. यासोबतच शरद पवार रूग्णालयात असताना भाजप नेते नारायण राणे यांनी देखील सहपरिवार शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या तब्यतेची विचारपुस केली होती. पक्ष वेगवेगळे असले, वैचारिक भूमिका भिन्न असल्या, तरी एखाद्या राजकीय नेत्याच्या आजारपणात त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पाहायला मिळते.

Related Stories

सोशल मीडिया सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी तन्मय देशमुख

Patil_p

चार दिवसात रस्त्याची कामे न केल्यास रस्ता रोको

Patil_p

सायकलचा अपमान हा देशाचा अपमान : अखिलेश यादव

Abhijeet Khandekar

खा.शरद पवार यांच्यासह मंत्री देशमुख,बनसोडे थेट बांधावर

Archana Banage

आनेवाडी टोलनाका 9 सप्टेंबरला बंद पाडणार

Patil_p

मावळ्यांनो गडसंवर्धनाच्या कामाला लागा

datta jadhav