Tarun Bharat

बावधनच्या तिघांवर तडीपारीची कारवाई

प्रतिनिधी/ वाई

बावधन (ता. वाई) येथील प्रशांत कदम-उर्फ बाबू रुस्तुकी, अनिकेत चव्हाण, आणि विजय जाधव या तीन जणांना तीन महिन्यासाठी वाई, सातारा, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. गर्दी, मारामारी दमदाटी करण्याचे गुन्हे दाखल होते. वाई पोलीस ठाण्याने वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊन त्याप्रमाणे नोटीस बजावली होती. त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने वाई पोलीस ठाण्याने समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण होऊ नये म्हणून त्यांच्या तडीपरीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना सादर केला होता. त्याप्रमाणे शनिवारी पोलीस अधीक्षकांनी तिघांच्या तडीपरीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

वाई पोलीस ठाण्यातील अधिकाऱयांनी प्रशांत कदम-उर्फ बाबू रुस्तुकी, अनिकेत चव्हाण, आणि विजय जाधव या तिघांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊन देखील त्यांच्या वागण्यामध्ये कसलीही सुधारणा न झाल्याने व तालुक्यातील नागरिकांना यांची केलेल्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांमधून यांच्याविरुद्ध तक्रारी येत होत्या. भविष्यात या तिघांकडून सातारा जिह्यामध्ये मोठय़ा टोळीत रूपांतर होऊन त्यांच्याकडून मोठय़ा घटना घडू शकतात हे नाकारता येत नसल्याने त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी वाई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी वरील तिघांच्या विरोधात सातारा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा अशा पाच तालुक्यातून तडीपार करण्याचा मागणीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना पाठविला होता. वरील तिघांवर विविध प्रकारची गुन्हे वाई पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने त्यांचा गंभीर विचार करून अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी वरील पाच तालुक्यातून तीन महिन्यासाठी तडीपार केल्याचे आदेश काढले आहेत. वाई पोलीस स्टेशनच्या या धाडसी कारवाईचे वाई तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

Related Stories

पालकांना दिलासा! खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात

Tousif Mujawar

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले…

Tousif Mujawar

अभिनेता गौरव 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठडीत

Tousif Mujawar

साताऱ्यात शनिवारी पाणी पुरवठा राहणार बंद राहणार

Archana Banage

रत्नागिरीत २४ तासात ४६ नवे रुग्ण

Archana Banage

टेस्टिंग न करताचा युवकाचा अहवाल कोरोना बाधित

Patil_p