Tarun Bharat

बावधन ओढय़ानजिक बस-ट्रकचा अपघात

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जाणाऱया एसटी बसचा आणि गॅसची वाहतूक करणारा ट्रक यांच्यामध्ये दुपारी बावधन ओढय़ानजिक अपघात झाला. अपघातातील जखमींना तत्काळ वाई येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी वाई पोलीस आणि वाईचे आगारप्रमुख गणेश कोळी यांनी भेट दिली. अपघाताची माहिती त्यांनी घेतली. या अपघातात नेमकी किती प्रवाशी जखमी झाले हे समजले नसले तरी 10 च्या सुमारास जखमी असण्याची शक्यता आहे.

साताऱयाहून वाईला निघालेली एसटी बस आणि वाईहून साताऱयाच्या दिशेने निघालेल्या गॅसचा ट्रक यांचा अपघात बावधन ओढय़ानजिक झाला. अपघात झाल्यानंतर बसचा चालकासह बसमधील प्रवाशी जखमी झाले असून त्यांना लगेच वाई येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघाताची माहिती वाई पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तसेच वाईचे आगारप्रमुख गणेश कोळी हेही घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. दरम्यान, जखमींना उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णालयातही त्यांनी भेट देऊन जखमी प्रवाशी व चालकाची चौकशी त्यांनी केली. या अपघाताची नोंद उशिरापर्यंत वाई पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

Related Stories

Satara : भरधाव सेन्ट्रो कारच्या धडकेत ओरिसाचा आचारी जागीच ठार

Abhijeet Khandekar

सातारा : गणेशोत्सवात नियमांचे पालन करा – शाहुपुरी पोलीस

Archana Banage

राज्यात पावसाचा जोर वाढणार

datta jadhav

सातारा : अवैध दारू वाहतूक करताना दोन युवक बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात

Archana Banage

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

Archana Banage

वाईची स्नेहांजली बनली नेव्हीत अधिकारी

Patil_p