Tarun Bharat

‘बाहुबली’चा व्हिडीओ ट्रम्प यांनी केला रिट्वीट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱयाच्या पार्श्वभूमीवर बाहुबली चित्रपटाच्या थीमवरील व्हायरल व्हिडीओ रिट्वीट केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी भारतातील मित्रांना भेटण्यास मी उत्साही असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी सॉल्मेम्स 1 नावाच्या ट्विटर हँडलसह हा व्हिडिओ रिट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये बाहुबली चित्रपटातील वेगवेगळे सीन आहेत. त्यामध्ये ट्रम्प अमरेंद्र बाहुबलीच्या भूमिकेत दिसत आहेत. माहिष्मती साम्राज्याच्या रक्षणासाठी रणांगणात तलवारी, धनुष्य घेऊन लढताना प्रभासच्या जागी ते आहेत. यामध्ये ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया आणि मुलगी इव्हांकाला दाखविण्यात आले आहे. तर पुढील दृष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी माहिष्मतीच्या प्रजेला मिठाई वाटताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.

Related Stories

गुजरात विधानसभा निवडणुक : अपक्ष निवडणूक लढणाऱ्या ७ जणांना भाजपने केले निलंबित

Abhijeet Khandekar

गुजरात : अहमदाबादमधील कोविड रुग्णालयाला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 97 नवे कोरोनाबाधित; 973 ॲक्टीव्ह रुग्ण

Tousif Mujawar

निलंबित खासदार आंदोलनावर ठाम; उपसभापतीही करणार एक दिवसीय उपोषण

datta jadhav

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

शेण अन् गोमुत्राने करत आहेत आंघोळ

Patil_p