Tarun Bharat

बिगरमुस्लिमांना ‘जन्नत’ नाही : झाकीर

Advertisements

वृत्तसंस्था / क्वालांलपूर :

मलेशियात राहत असलेला फरार इस्लामिक उपदेशक झाकीर नाईकने बिगरमुस्लिमांबद्दल पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. चांगले विचार बाळगणाऱया ‘बिगर मुस्लिमांना’ही जन्नत (स्वर्ग) मिळणार नाही. मुस्लिमांबद्दल चांगली भूमिका असणाऱया अन्यधर्मीयांनी धर्मांतर करून इस्लाम स्वीकारलेला नसल्याने त्यांना जन्नत मिळणार नसल्याचे झाकीर बरळला आहे.

अशाप्रकारचे अन्यधर्मीय नरकातच जातील, मूर्ती पूजा करण्याचे त्यांचे पाप अन्य कुठल्याही गुन्हय़ापेक्षा अधिक मोठे असल्याचे म्हणत झाकीरने अन्यधर्मीयांबद्दल विष ओकले आहे. नाईक याची नवी चित्रफित युटय़ूबवर अपलोड करण्यात आली आहे. झाकीर याच्या विरोधात भारतात कारवाईचा विळखा घट्ट केला जात आहे. केंद्र सरकारने झाकीरच्या प्रत्यार्पणासाठी मलेशिया सरकारकडे औपचारिक विनंती केली आहे.

मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

केंद्र सरकारने झाकीरचा मुद्दा मलेशियाच्या सरकारसमोर उपस्थित केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा झाकीरप्रकरणी तपास करत आहे. परंतु चौकशीस प्रारंभ होण्यापूर्वीच झाकीरने भारतातून पलायन केले होते. तेव्हापासून तो मुस्लीमबहुल मलेशियात वास्तव्यास आहे. झाकीरवर मनी लॉन्ड्रिंग आणि द्वेष फैलावल्याचा आरोप आहे. 2016 मध्ये ढाका शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी झाकीरचे नाव समोर आले होते. झाकीरच्या द्वेषपूर्ण भाषणांमुळेच बॉम्बस्फोट घडविण्याची प्रेरणा मिळाल्याचे एका दहशतवाद्याने मान्य केले होते. भारतासह अनेक देशांनी झाकीरच्या पीस टीव्हीच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.

मलेशियाचे नागरिकत्व

ब्रिटन आणि कॅनडाने व्हिसा देण्यास नकार दिल्यावर झाकीरने मलेशियाचे नागरिकत्व मिळविले होते. झाकीरच्या इस्लामिक रिसर्च फौंडेशनने 2007-2011 दरम्यान मुंबईत पीस कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करणे आणि हिंसाचार फैलावण्याचा आरोप झाकीरवर आहे. परंतु झाकीरने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Related Stories

केरळमध्ये इन-कार डायनिंग सुविधा

Patil_p

चोवीस तासातील मृत प्रथमच ‘पाचशे’पार

Patil_p

दिल्ली : पहिल्या 2 तासात 5.60 टक्के मतदान

prashant_c

देशावर येणार पुन्हा वीज संकट; कसे ते पाहूया

Kalyani Amanagi

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रियाज नायकू अखेर ठार 

Rohan_P

बॉलिवूडमधील ‘धोनी’ पडद्याआड

Patil_p
error: Content is protected !!