Tarun Bharat

बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशातील 13 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातील बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मोठा निर्णय केंद्र घेतला आहे. त्यासाठी या लोकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

हे निर्वासित गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि पंजाबसह 13 जिल्ह्यांमध्ये राहत आहेत. त्यामध्ये हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्माच्या नागरिकांकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकत्व कायदा, 1955 आणि 2009 अंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी या संबंधीची अधिसूचना जारी केली आहे. तथापि, सरकारने अद्याप 2019 मध्ये लागू झालेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यांतर्गत (सीएए) नियम तयार केलेले नाहीत.

कोणत्या निर्वासितांना नागरिकत्व मिळेल?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार (सीएए) बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार झालेल्या बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यात येईल, जे 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आले होते.

Related Stories

बंगालमध्ये अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

Patil_p

‘ज्यांनी मत दिले नाही त्यांना मदत नाही’ : भाजप आमदार

Archana Banage

‘डबल इंजिन’ सरकारचा उत्तरप्रदेशला लाभ

Patil_p

दिल्लीत 154 नवीन कोरोनाबाधित

Tousif Mujawar

30 किलो हेरॉईनसह 8 पाकिस्तानी नागरिकांची बोट पकडली

Tousif Mujawar

बळीराजाची आज राजधानीत धडक

Patil_p
error: Content is protected !!