Tarun Bharat

बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

मुंबई/प्रतिनिधी

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला आहे. अनेक हिंदी मालिकांमध्ये सिद्धार्थने प्रमुख भूमिका केल्ताया आहेत. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत. सिद्धार्थाचा मृतदेह कुपर रुग्णालयात असून पोलिसांचं एक पथक रुग्णालयात गेलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.

सिद्धार्थच्या निधनची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली असून रुग्णालयाने हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं म्हंटलं आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.

Related Stories

अभिनेता संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास

Patil_p

खा. उदयनराजेंनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चांना उधाण

datta jadhav

‘Black Fungus’वरुन राहुल गांधींचे मोदी सरकारला तीन प्रश्न

Archana Banage

देशात सलग तिसऱ्या दिवशी अडीच लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Abhijeet Khandekar

रशियात 8 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

तरुणास जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण

Abhijeet Khandekar