Tarun Bharat

बिडी कॉलनीत पाण्यासाठी धावाधाव

प्रतिनिधी / कोल्हापूर

सानेगुरुजी वसाहत प्रभागातील राजोपाध्येनगर, बीडी कामगार वसाहत, साईप्रसाद कॉलनीसह परिसरातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाला आहे. ऐन सणासुदीमध्ये पाण्यासाठी धावाधाव करावी लागत असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातच प्रशासनाकडून टँकरचा पुरवठाही वेळेत होत नसल्याने काही नागरिकांना खासगी पाणी पुरवठÎाचा आधार घ्यावा लागत आहे.

सानेगुरुजी वसाहत प्रभागात दोन टप्प्यात पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये काही भागात सकाळी तर काही भागात रात्री पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात रात्री उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रात्र जागून काढून सुद्धा पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. आता तर नवरात्र, दसरा या ऐन सणासुदीमध्ये दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. महापालिकेचे जल अभियंता अजय साळोखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परिसरातील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. दुरूस्ती केली असून आज, बुधवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल.

Related Stories

कोल्हापूर – सांगली राज्य महामार्ग हेरले नजीक खचला

Archana Banage

कोल्हापूर : पाचगावात दोन गटात मारामारी, एक जण गंभीर जखमी

Archana Banage

उदगांव येथील महादेवी मंदिरातून सोन्याचे चार मंगळसूत्र लंपास

Abhijeet Khandekar

Kolhapur; राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल!

Abhijeet Khandekar

राधानगरी तालुक्यात पारंपारिक पद्धतीने बेंदूर साजरा

Archana Banage

पाल घाटात दरड कोसळल्याने तीन तास वाहतूक ठप्प

Archana Banage