Tarun Bharat

बिनतारी संगणकीय जाळय़ाचा जनक हरपला

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

दूरसंचारक्षेत्रात बिनतारी संगकीय जाळय़ाचे (वायरसेल कॉम्प्युटर नेटवर्क) जनक नॉर्मन अब्रामसन यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. प्रारंभिक वायरलेस नेटवर्क ‘एएलओएचएनेट’च्या निर्मितीचे शेय दिले जाते. याच्या निर्मितीनंतरच पुढील पिढीच्या तंत्रज्ञानांनी याचा वापर आधुनिक उपग्रह, फोन आणि संगकीय जाळय़ात केला आहे. अब्रामसन यांचा मृत्यू त्वचेच्या कर्करोगामुळे ओढवला आहे. कर्करोगामुळे त्यांच्या फुफ्फुसांमध्ये मेटास्टेसिस झाले होते.

अब्रामसन यांनी स्वतःचा पहिला प्रकल्प हवाई विद्यापीठात तयार केला होता. यांतर्गत त्यांनी एका शाळेला दूरस्थ भौगोलिक स्थितीपासून अमेरिकेला डाटा पाठविणे आणि प्राप्त करण्यात मदत करणारे एक रेडिओ तंत्रज्ञान विकसित केले होते. तंत्रज्ञानात एक महत्त्वपूर्ण संशोधन पॅकेटमध्ये डाटाचे विभाजन करणे होते. ट्रान्समिशनदरम्यान डाटा गमाविल्यास तो पुन्हा पाठविता येण्यासाठी हे महत्त्वाचे होते. एएलओएचनेट हा आधुनिक बिनतारी संचाराचा पाया होता, याचबरोबर ईथरनेट आधारित संचाराच्या विकासातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. अब्रामसन यांचा जन्म 1 एप्रिल 1932 रोजी बोस्टनमध्ये झाला होता. 1994 मध्ये सेवानिवृत्त होण्यापूर्वी ते हवाईमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

Related Stories

ट्रम्प डेथ क्लॉक

Patil_p

जो चीनवरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला

Amit Kulkarni

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेचार कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav

जागतिक शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव

Amit Kulkarni

बोको हरामच्या दहशतवाद्यांनी केली 43 शेतमजुरांची हत्या

datta jadhav

फिलिपिन्स हवाई दलाचे विमान दुर्घटनाग्रस्त; 40 जणांना वाचवण्यात यश

datta jadhav
error: Content is protected !!