Tarun Bharat

बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा बळी

कराड / प्रतिनिधी :

बिबट्याची कराड तालुक्यात दहशत वाढली असून सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. येणके ता.कराड येथे बिबट्याने ऊसतोड मजुराच्या सात वर्षीय मुलास फरपटत ओढून नेत त्याचा बळी घेतला. आकाश बिगाशा पावरा असे बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

या घटनेमुळे कराड तालुका हादरला असून बिबट्या आता माणसांचेही बळी घेऊ लागला आहे. आकाशचे वडील ऊसतोड मजूर आहेत. सोमवारी सकाळी येणके-किरपे रोडवरील शिवारात बिबट्याने आकाशवर अचानक हल्ला केला. काही कळायच्या आत बिबट्याने आकाशला फरपटत ओढत नेऊन त्याचा बळी घेतला. कराड तालुक्यात यापुर्वीही बिबट्याने शेतकरी, महिलांसह लहान मुलांवर हल्ले केले आहेत. येणके येथे घडलेल्या घटनेने बिबट्याची दहशत वाढल्याचे समोर येत आहे.

Related Stories

दिशाभूल करण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

Patil_p

सातारा हाफ हिल मॅरेथॉन मध्ये धावताना कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू

Archana Banage

जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

datta jadhav

धुमाळास निलंबीत करण्याचा ठराव

Patil_p

पोलीस वेलफेअर फंडला एक लाखाचा मदतनिधी

Patil_p

आमदार शिवेंद्रराजे आणि आ.शशिकांत शिंदे एकत्र

Archana Banage