Tarun Bharat

बिबटय़ाची दुचाकीवर झडप, चालक जखमी

Advertisements

संगमेश्वर-माभळे-उजगाव मार्गावरील घटना, -प्रसंगावधानामुळे दोघांचे वाचले प्राण

वार्ताहर/ संगमेश्वर

तालुक्यातील माभळे-उजगाव मार्गावर दुचाकीस्वारावर बिबटय़ाने झडप टाकल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. बिबटय़ाने दुचाकीस्वारांचा सुमारे 1 किलोमीटर पाठलागही केला, मात्र दुचाकीस्वाराने समयसूचकता दाखवल्याने दोघांचे प्राण वाचले आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी 7च्या सुमारास घडली.

  गुरुवारी सायंकाळी विलास कानसरे आणि नीलेश कानसरे दुचाकीने उजगावकडे जात असताना जंगलात दडी मारून बसलेल्या बिबटय़ाने मागे बसलेल्या विलास कानसरेवर झेप घेत पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीस्वार नीलेशने न घाबरता दुचाकी वेगाने चालविली. बिबटय़ाने दुचाकीचा उजगाव-गवळवाडीपर्यंत पाठलाग केला. मात्र तेथे ग्रामस्थांना पाहून बिबटय़ाने धूम ठोकली. बिबटय़ाच्या हल्ल्यावेळी दुचाकीवरील दोघेही भयभीत झाले होते. यात विलास कानसरेला बिबटय़ाने पंजा मारल्याने तो जखमी झाला आहे. या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या अगोदर बिबटय़ाने मानवी वस्तीत येऊन डुकराच्या पिल्लाला ठार मारले होते तर कुत्र्यावर हल्ला केला होता. आता थेट मानवांवर हल्ला झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

भोसलेंची दुचाकीस्वारांना मदत

याच रस्त्याने दररोज रिक्षा घेऊन जाणाऱया किरण भोसले याला बिबटय़ाचे अनेकदा दर्शन झाले होते. बिबटय़ाने दुचाकीस्वारांचा पाठलाग केला, त्यावेळीही ते त्याच भागात होते व त्यांनीही दुचाकीस्वारांना मदत केली.

Related Stories

दशावतारी लोककला संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

NIKHIL_N

‘ती’ सुद्धा आली मुंबईतून चालत दापोलीत

Archana Banage

मालवणात अनेक पशु-पक्षांचे वास्तव्य

NIKHIL_N

जाहीर प्रचार थंडावला…

Patil_p

‘हॅप्पी हाय फॉक्सिया’चा रत्नागिरीत शिरकाव

Patil_p

वैभववाडी नगराध्यक्षांचा राजीनामा

NIKHIL_N
error: Content is protected !!