Tarun Bharat

बिबटय़ाच्या कातडय़ासह पाच जेरबंद

Advertisements

स्थानिक गुन्हा अन्वेषणची मळगाव घाटीत कारवाई : कातडय़ाची किंमत साडेतीन लाख : संशयित सावंतवाडी, देवगड येथील

सावंतवाडी:

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गुरुवारी मळगाव घाटीत सापळा रचून बिबटय़ाची कातडी वाहतूक करणाऱया क्वालीस कारसह पाचजणांना जेरबंद केले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी व्यंकटेश दत्तात्रय राऊळ (31, रा. माजगाव-कासारवाडा, सध्या रा. सावंतवाडी), किरण राजाराम सावंत (44, रा. चराठा हेळेकर मंदिरजवळ, सावंतवाडी), नितीन प्रकाश सूर्यवंशी (42, रा. माजगाव कासारवाडा), समीर सूर्यकांत गुरव (23, रा. पेंढरी- देवगड) तसेच दिनेश काशिनाथ गुरव (27, पेंढरी-देवगड) या संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना अधिक तपासासाठी वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या सर्वांनी बिबटय़ाची हत्या कुठे केली? कातडे कुठे विकणार होते? यात आणखी कुणाचा समावेश आहे का, याचा तपास वनखाते करणार आहे.

अलिकडच्या काळात सिंधुदुर्गातून खवले मांजराची तस्करी होत होती. काहींना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी वाघाची कातडी विकत असताना चराठा येथील एकाला अटक करण्यात आली होती. त्यावेळी एका
वन्यप्राणी प्रेमीच्या सहकार्याने वनविभागाने कारवाई केली होती. त्यानंतर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मळगावमार्गे बिबटय़ाच्या कातडीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, हवालदार सुधीर सावंत, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, चंद्रकांत पालकर, प्रवीण वालावलकर, प्रथमेश गावडे, रवी इंगळे यांनी मळगाव घाटीत दुपारी सापळा रचला. मळगावहून सावंतवाडीच्या दिशेने येणारी लाल रंगाची क्वालीस कार (एमएच-06/टी-8117) तपासणीसाठी थांबविण्यात आली. कारमध्ये पाच तरुण होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कारच्या पाठीमागे सीटखाली तपासणी केली असता कापडात गुंडाळून ठेवलेले काहीतरी दृष्टीस पडले. पोलिसांनी ते उघडून पाहिले असता ती बिबटय़ाची कातडी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. तसेच कातडी व क्वालीस कार जप्त केली. त्यानंतर मुद्देमाल आणि संशयिताना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. तत्पूर्वी घटनेचा पंचनामा करण्यात आला. कातडय़ाची किंमत साडेतीन लाख रुपये तर क्वालीस कारची किंमत दीड लाख असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Related Stories

जिह्यात कोरोनाची रेकॉर्डब्रेक रूग्णवाढ

Patil_p

रत्नागिरी : वरवलीत आणखी ३ वाड्या कन्टेनमेंट झोन

Archana Banage

जिह्यात कोरोनाचे आणखी 631 नवे रूग्ण

Patil_p

दूरसंचारची भारत एअर फायबर सेवा

NIKHIL_N

कोरोना संसर्गाचे प्रमाण काहीसे घटले

NIKHIL_N

लेप्टोस्पायरोसीससाठी 222 गावे जोखीमग्रस्त

NIKHIL_N
error: Content is protected !!