Tarun Bharat

बिबटय़ासदृश प्राण्यासाठी शोध मोहीम सुरूच

रेसकोर्स परिसरात वनखात्याचे पथक तळ ठोकून

 प्रतिनिधी/ बेळगाव

हनुमाननगर येथील असलेल्या रेसकोर्स (गोल्फ मैदान) परिसरात गुरुवारी सकाळी बिबटय़ासदृश प्राणी निदर्शनास आल्याने शहरात खळबळ माजली.  वनविभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम हाती घेतली आहे.  शुक्रवारी दुसऱयादिवशीदेखील शोध सुरूच होता. मात्र अद्याप वनखात्याच्या हाताला काहीच लागलेले नाही. त्यामुळे निदर्शनास आलेला प्राणी बिबटय़ाच होता की आणखी कोणता प्राणी होता. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

रेसकोर्स मैदानावर फिरायला गेलेल्या काही नागरिकांना बिबटय़ासदृश प्राण्यांचे दर्शन झाले होते. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली होती. वनविभागाने तातडीने दाखल होऊन रेसकोर्स परिसर पिंजून काढला होता. मात्र बिबटय़ाच्या पाऊल खुणा किंवा इतर कोणतीच बाब निदर्शनास आली नाही. तरीही परिसरात बिबटय़ासदृश प्राण्याच्या पावलांच्या ठशांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच बिबटय़ाच्या हालचालांवर नजर ठेवण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच बिबटय़ाला पकडण्यासाठी परिसरात सापळा रचून बकरी व कुत्री बांधण्यात आली आहेत. मात्र वनविभागाच्या हाताला अद्याप काहीच लागले नाही. भक्ष्याच्या शोधार्थ रेसकोर्समध्ये आलेला हा प्राणी बिबटय़ाच आहे. की? दुसरा कोणता प्राणी आहे, याचा शोध सुरू आहे. वनविभागाचे विशेष पथक परिसरात तळ ठोकून असले तरी शोध घेण्यास दुसऱयादिवशीही अपयश आले आहे.

Related Stories

खासगी टय़ूशनवर शिक्षण विभागाकडून येणार नियंत्रण

Patil_p

जैन समाजाच्या विकासात पुरोहितांची भूमिका महत्त्वाची

Amit Kulkarni

मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

अथणी शुगर्सच्या 20 व्या गळीत हंगामास प्रारंभ

Patil_p

दलित संघर्ष समितीचे रेल्वेस्थानकात आंदोलन

Amit Kulkarni

ग्रा. पं.कर्मचाऱयांचे जिल्हा पंचायतसमोर ठिय्या

Amit Kulkarni