Tarun Bharat

बिल्डरची फसवणूक करणाऱया 13 जणांवर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयातील बांधकाम व्यावसायिक सचिन घनश्याम वाळवेकर यांना काळे पैसे स्वच्छ करुन देण्याचा बहाणा करत 1 कोटी 27 लाख 46 हजार रुपयांना गंडा घालणाऱया 13 संशयित आरोपींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी, सचिन वाळवेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मार्च 2018 पासून 15 ऑक्टोबर 2018 या कालावधीत सोलेमन, सिसो, पोटलाकोथबाने, एडवर्थ स्मिथ, बेल्सन्स, जॉर्ज, मॉरिस, योयोबो ईगरे, मॉरिस गोल्डबन, मॉर्गन, सॅम, अल्फेंड, डॉनियल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या संशयित आरोपींनी तक्रारदार वाळवेकर यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लावलेले पैसे काळे करुन ते काळे झालेले पैसे स्वच्छ करुन देण्यासाठी संशयित आरोपींनी तक्रारदाराकडून 1 कोटी 27 लाख 46 हजार रुपये वेळोवेळी घेतले.

मात्र, त्यानंतर तक्रारदार वाळवेकर यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यांना पैसे परत न मिळाल्याने शेवटी त्यांनी 12 सप्टेंबर 2020 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास सातारचे उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख करत आहेत. पूर्ण नाव, पत्ता माहिती नसलेल्या संशयितांना पकडण्याचे आव्हान आता सातारा पोलिसांसमोर आहे.

Related Stories

पांगारे येथे बछडय़ासह बिबटय़ा मादीचे दर्शन

Patil_p

पुन्हा पसरलेल्या ‘लॉकडाऊन’ च्या अफवेने सातारकर चिंतेत

Archana Banage

रत्नागिरी, साताऱ्यात आकाशात हलणाऱ्या दिव्यांच्या माळा पाहून उडाली अनेकांची घाबरगुंडी

Archana Banage

सातारा : कांद्याच्या तरवाची मागणी वाढली

Archana Banage

CBSE Board 12th Result : आज दुपारी २ वाजता जाहीर होणार निकाल

Archana Banage

साताऱ्यात आज ४३ जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू

Archana Banage