Tarun Bharat

बिल गेट्स, ओबामांचे ट्विटर खाते हॅक

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क :

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍलन मस्क आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक वलयांकित व्यक्ती तसेच कंपन्यांचे ट्विटर खाते हॅक करण्या आले आहे. हॅकर्सनी ऍपल आणि उबेरच्या ट्विटर खात्यालाही लक्ष्य केले आहे. क्रिप्टोकरन्सी फसवणुकीसाठी हॅकर्सनी बहुचर्चित लोकांच्या नावाचा वापर केला आहे.

हॅकर्सनी दिग्गज व्यक्ती आणि कंपन्यांच्या नावाने फसवणूक केली आहे. दिग्गजांच्या अधिकृत ट्विटर खात्याला हॅक करून त्यावरुन संदेश पाठविला आहे. या संदेशाद्वारे लोकांची बिटकॉइनच्या स्वरुपात फसवणूक करण्यात आली आहे. हॅकर्सनी किती प्रमाणात माहितीवर डल्ला मारला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्विटर खात्याच्या संदेशांवर नियंत्रण मिळविल्यास हॅकर्स लोकांना ब्लॅकमेल करू शकतात. यंदा होणाऱया अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतही हॅकर्स हस्तक्षेप करू शकतात, असे सायबर सिक्युरिटी तज्ञांनी म्हटले आहे.    

हा अवघड काळ असून आम्ही चौकशी करत आहोत. हा प्रकार कसा घडला हे स्पष्ट झाल्यावर तपशील उपलब्ध केला जाणार असल्याचे विधान ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी केले आहे. ट्विटरने हॅक करण्यात आलेली खाती डिसेबल करत बनावट ट्विट्स हटविली आहेत.

Related Stories

बागेश्वरनंतर आता उत्तरकाशीमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

सौरव गांगुलीची पत्नी राज्यसभेवर जाणार?

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये लसीकरणावरून राजकारण

Patil_p

ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीत वाढ

Amit Kulkarni

आफताबला 14 दिवस न्यायालयीन कोठडी

Patil_p

19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन शक्य

Patil_p