Tarun Bharat

बिल गेट्स-मेलिंडा घेणार घटस्फोट

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :   

27 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा या दोघांनी घटस्फोट घेणार असल्याचे आज जाहीर केले.  

बिल गेट्स यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 27 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय आम्ही पती-पत्नीने घेतला. 27 वर्षात मुलांचे संगोपन करत त्यांना मोठे केले. आता आम्ही एकत्र राहू शकत नाही. आम्ही बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात मोठी खासगी चॅरिटेबल संस्था उभी केली. ती जगभरातील लोकांना आरोग्य सुविधा आणि चांगल राहणीमान देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 1987 मध्ये मेलिंडा यांच्यासोबत पहिली भेट झाली. त्यावेळी मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या. 1994 मध्ये या दोघांनी हवाईच्या लानी बेटावर लग्न केले.    

बिल आणि मेलिंडा गेट्स घटस्फोट घेणार असले तरी फाउंडेशनमधील आपली जबाबदारी आणि पद ते कायम ठेवणार आहेत. फाउंडेशनमध्ये 65 वर्षीय बिल हे अध्यक्ष आहेत. तर मेलिंडा उपाध्यक्ष आहेत. घटस्फोटानंतरही बिल आणि मेलिंडा एकत्र काम करणार आहेत. 

Related Stories

भारत-चीन यांच्यात सीमाविषयक बैठक

Patil_p

ऑस्कर : प्रदर्शनसंबंधी अटीपासून सूट

Omkar B

फ्रान्समध्ये संकट कायम

Patil_p

दगडात रोवलेली 700 वर्षे जुनी तलवार

Amit Kulkarni

तणाव विकोपाला

Patil_p

9 शहरांमध्ये संचारबंदी

Patil_p