ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारचे काँग्रेस प्रभारी शक्ती सिंग गोहिल यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शुक्रवारी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज मी कोरोनाची आरटी – पीसीआर टेस्ट केली असता, त्यातून मला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांसह कोरोनाला देखील हरवेन, काळजी करण्याचे काही कारण नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, सध्या बिहारमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 20 हजार 992 वर पोहचली असून 2 लाख 12 हजार 911 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1, 129 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.