Tarun Bharat

बिहारच्या प्रीति प्रियदर्शिनीला प्रतिष्ठेचा जागतिक पुरस्कार

Advertisements

बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनकडून गौरव

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारच्या प्रीति प्रियदर्शिनी हिला बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनकडून विलियम एच फोगे ग्लोबल हेल्थ अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. फौंडेशनकडून हा पुरस्कार सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱया समाजसेवकांना दिला जातो. 4 वर्षांपूर्वी ज्या फौंडेशनमुळे प्रेरित होऊन भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये काम केले, आज त्याच संस्थेकडून पुरस्कार मिळणे गौरवाची बाब असल्याचे उद्गार तिने काढले आहेत.

प्रियदर्शिनीने भारताच्या विविध राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात स्वतःचे योगदान दिले आहे. झारखंड, बिहार आणि राजस्थानच्या ग्रामीण भागांमध्ये तिने प्रंटलाइन हेल्थ वर्कर म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये तिला भारताच्या ‘एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स’मध्ये सेवा बजावण्यासाठी गृह मंत्रालय, भारत आणि नीति आयोगाकडून निवडण्यात आले होते. प्रीतिने झारखंडच्या हजारीबाग आणि लातेहारच्या जिल्हाधिकाऱयांसोबत काम केले आहे. लातेहार जिल्हय़ात कोरोना कृतिदलाचे नेतृत्वही तिने केले आहे.

Related Stories

उत्तराखंडात 120 नवे कोरोना रुग्ण; 330 जणांना डिस्चार्ज

Rohan_P

एअर इंडियासाठी बोली लावणाऱ्यांची नावे गोपनीय

datta jadhav

जून-जुलैमध्ये आढळतील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण : एम्स संचालक

Rohan_P

रस्तेदुर्घटना भरपाईसाठी कालमर्यादा निश्चित

Amit Kulkarni

सर्व प्रलंबित खटले 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकला : मुंबई उच्च न्यायालय

prashant_c

चारधाम यात्रेवरील बंदी उठवली

datta jadhav
error: Content is protected !!