Tarun Bharat

बिहारमध्ये दलित समाजातील दोघांची गोळ्या झाडून हत्या

ऑनलाईन टीम / पाटणा : 

बिहारमध्ये दलित समाजातील दोघांची गोळ्या घालून अज्ञातांनी हत्या केली. पूर्णिया जिल्ह्यातील चांदपूर भांगहान गावात मध्यरात्री ही घटना घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी विभाष कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

अनमोल ऋषी (वय 50) व सुबोध ऋषी (45 ) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल आणि सुबोध हे दोघेही चांदपूर भांगहान गावातील रहिवाशी आहेत. मध्यरात्री काही लोक या दोघांच्या घराजवळ आले. त्यांना बाहेर बोलावून लाठ्या, काठयांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मालमत्तेत वाटा

Patil_p

उत्तराखंड : कोरोनापेक्षा अधिक घातक ‘ब्लॅक फंगस’; मृत्यू दर 15.73 %

Tousif Mujawar

राजपक्षेंचा पक्ष बहुमताच्या दिशेने

Patil_p

तेजस्वी यादव यांच्या घरावर ईडीची धाड

Patil_p

पंजाबमध्ये 845 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 26 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवाला आजपासून प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!