- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.58 %
ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये दिवसभरात 622 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 03 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 51 हजार 926 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 523 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,51,926 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 45 हजार 828 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.58 % आहे. तर आतापर्यंत 1, 389 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 81 लाख 14 हजार 647 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 708 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.