Tarun Bharat

बिहारमध्ये रेल्वे भरतीचं प्रकरण चिघळलं, विद्यार्थी रस्त्यावर

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बिहारमध्ये RRB-NTPC परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज बिहार बंदची घोषणा केली आहे. या बंदचा व्यापक परिणाम सकाळपासून दिसून येत आहे. बंद यशस्वी करण्यासाठी सकाळपासूनच विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान हा वाद चिघळला असून सत्ताधारी पक्षाचे नेते, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ​​लालन सिंह यांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण बिहार राज्यात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पोलिसांनी आश्वासने देणार्‍या शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. याशिवाय आंदोलक विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहनही केले आहे.

Related Stories

लोकपालाकडे भ्रष्टाचाराच्या 1,719 तक्रारी

Patil_p

शिवकुमार यांना दिल्लीतील न्यायालयाकडून समन्स

Patil_p

मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Abhijeet Shinde

26 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

Patil_p

भारताचा चीनला दणका : भारतीय रेल्वेने केले आणखी एक कंत्राट रद्द

Abhijeet Shinde

घुसखोरीचा डाव उधळला; दहशतवाद्याचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!