Tarun Bharat

बिहारमध्ये सापडले सर्वात मोठे सुवर्णभांडार

बिहार हे राज्य भारतातील अत्यंत गरीब राज्यांमधील एक म्हणून समजले जाते. येथील लोकसंख्या प्रचंड आहे, पण उत्पन्नाची साधने किमान आहेत. त्यामुळे बरेच बिहारी पोटासाठी मातृराज्य सोडून अन्यत्र गेलेले आहेत. तथापि, हेच गरीब बिहार राज्य भारताच्या श्रीमंतीला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत.

याचे कारण असे की, भारतातील सर्वात मोठय़ा सोन्याच्या खाणी बिहारमध्ये आढळून आल्या आहेत. या राज्यातील पश्चिम चंपारण्य हा जिल्हा सुवर्णभूमी म्हणून नाव कमावेल, अशी शक्मयता निर्माण झाली आहे. येथे भूवैज्ञानिकांनी नुकतेच व्यापक सर्वेक्षण केले असून या जिल्हय़ाच्या काही भागांमध्ये सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत. या भागात एकंदर 250 टन सोने धातू स्वरुपात सापडू शकते, असा संशोधकांचा विश्वास आहे. आजच्या हिशोबात याची एकंदर किंमत अब्जावधी इतकी प्रचंड होते. या राज्याच्या जमुई जिल्हय़ातही 37 टन सुवर्णक्षार सापडण्याची शक्मयता आहे. गया आणि रोहतास या जिल्हय़ांमध्येही मौल्यवान धातूंचे भांडार असल्याची शक्मयता व्यक्त होत आहे.

Related Stories

भाजप गंगेसारखा; डुबकी मारल्यास होईल पापांची मुक्तता

datta jadhav

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Archana Banage

कंगना राणावतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सोशल मिडीयावर चर्चा

Kalyani Amanagi

‘स्पुटनिक-व्ही’चे देशातच होणार उत्पादन

Patil_p

ज्येष्ठ कसोटीपटू बापू नाडकर्णी कालवश

Patil_p

उत्तर प्रदेशात विवाहनोंदणी अनिवार्य

Patil_p