Tarun Bharat

बिहारमध्ये NDA ने राखली सत्ता

ऑनलाईन टीम / पाटणा : 

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी रात्री उशिरा पूर्ण झाली. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ने 125 जागा मिळवत बिहारमध्ये सत्ता राखली आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.

125 जागांमध्ये 74 जागा भाजपाने, 43 जागा जदयूने तर मित्र पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मुसंडी मारणाऱ्या राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस प्रणित महाआघाडीला 110 जागा मिळाल्या. महाआघाडीतला राजद हा 76 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला 19 तर डाव्यांना 16 जागा मिळाल्या. 

तर एमआयएमला 5 जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.

Related Stories

भीमा कोरेगाव प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर

Abhijeet Khandekar

कर्नाटकातील ओमिक्रॉन प्रकरणांपैकी 92% बेंगळूरमध्ये; 84% सक्रिय

Abhijeet Khandekar

मिरज मतदार संघात दोन वर्षात 206 कोटींचा निधी

Abhijeet Khandekar

हवाई दलाचे C-17 काबुलसाठी सज्ज

datta jadhav

देशात 24 तासात कोरोनाचे 4187 बळी

datta jadhav

साडे पाच हजार खेळाडूंनी कबड्डीसाठी ठोकला ‘शड्डू’

Abhijeet Khandekar