Tarun Bharat

बिहार : तीन महिलांना डायन म्हणत जमावाकडून मारहाण, विवस्त्र करून काढली धिंड

ऑनलाईन टीम / मुजफ्फरपूर :

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील डकरामा गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या गावातून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या गावातील तीन महिलांना जमावाने विवस्त्र करून मारल्याचे दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फरपूरमधील डकरामा गावातील तीन महिलांवर गावातील लोकांनी काळी जादू करत असल्याचा आरोप ठेवून या महिलांना बेदम मारहाण केली व त्यानंतर त्यांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच गावातील लोक त्यांना डायन देखील म्हणत आहेत. याचा अनेक लोकांनी व्हिडिओ काढला आहे. 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस आणि दखल घेत, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 

याबाबत माहिती देताना मुजफ्फरपूर चे पोलीस अधिकारी कुंदन कुमार यांनी सांगितले की, हा एक गुन्हा आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. 

Related Stories

मराठी शुद्धलेखन तज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

Tousif Mujawar

राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून दीवचे कौतुक

Patil_p

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांचा राजीनामा; भाजप आमदारांची आज बैठक

Archana Banage

विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशानत आणि तो काँग्रेसचाच होणार – बाळासाहेब थोरात

Archana Banage

ममता बॅनर्जींसंबंधी याचिकेच्या सुनावणीतून न्यायाधीशांची माघार

Patil_p

कोरोनामुळे भारतात 47 लाख बळी : डब्ल्यूएचओ

Amit Kulkarni