Tarun Bharat

बिहार निवडणुकीत ‘टूथ पिक’ द्वारे दाबले जाणार ईव्हीएम बटण

  • निवडणूक कर्मचारी घालणार पीपीई किट 

ऑनलाईन टीम / पाटणा : 


कोरोना संकट आणि पूर संकट दरम्यान बिहार विधानसभा निवडणूक वेळेतच पूर्ण करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानंतर आयोगाने याबाबत नियमावलीचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये निवडणुकीच्या वेळी मतदान कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालावे लागणार आहे. मतदारांना संसर्ग होऊ नये म्हणून ईव्हीएम मशीनचे बटण दाबण्यासाठी ‘टूथ पिक’ चा वापर करण्यास सांगितले आहे. 


आयोगाचे सचिव एन टी भूटिया यांनी राजकीय दलांकडून 31 जुलैपर्यंत आराखड्यासंदर्भात सूचना मागविल्या आहेत. त्याआधारे आयोगाकडून नियमावली जारी केली जाईल. आराखड्यानुसार सर्व कर्मचारी आणि निवडणुकीचे काम करणाऱ्या लोकांना मास्क आणि हातमोजे घालणे बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी, निवडणूक कार्यालय आणि पोलिंग बूथवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागेल. 


तसेच राजकीय पक्षांना रॅली काढण्यास मनाई असेल. सामाजिक कार्यक्रम आणि धार्मिक आयोजनांवर देखील बंदी असणार आहे. स्क्रीनिंग सक्तीचे असेल. पोलिंग बूथवर मतदारांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाईल. 


यासोबतच मतदान केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी व्यापक नियंत्रक सिस्टिमचा अवलंब केला जाईल. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी कर्मचारी आणि बूथची संख्या वाढवण्याचा विचार सुरू आहे. 

Related Stories

चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

Patil_p

श्रीनगर येथे दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला

Archana Banage

गोव्यात 31 मेपर्यंत कोरोना कर्फ्यू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

Tousif Mujawar

बाधिताच्या घराबाहेर फलक लावू नयेत!

Omkar B

वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत चर्चा

Amit Kulkarni

मूल्यांकन परीक्षा निर्णयाला आव्हान

Patil_p