Tarun Bharat

बिहार निवडणुकीत नवा पक्ष, लंडनमधून तरुणीचा मुख्यमंत्रिपदावर दावा

Advertisements

ऑनलाईन टीम / पाटणा : 

आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी एकीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. तर दुसरीकडे, आरजेडी नेता तेजस्वी यादव हे महागठबंधनकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, नुकतीच बिहारच्या जनतेला तिसऱया मुख्यमंत्री दावेदाराची ओळख झाली.

लंडनमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीनं थेट बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय. तिच्या या दाव्यामुळं बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा अप्रत्यक्ष बिगुल वाजला आहे.

बिहारच्या अनेक मुख्य वर्तमानपत्रांमध्ये रविवारी एक जाहिरात छापून आली. यामध्ये पुष्पम प्रिया चौधरी नावाच्या एका महिलेने स्वतःला 2020 विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाची दावेदार म्हणून स्वःघोषित केलं आहे. मूळची बिहारचीच असलेली पुष्पम सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळं ती निवडणुकीच्या आधीच बिहारमध्ये सक्रीय होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या जाहिरातीत पुष्मप प्रिया चौधरी यांनी एक पंच लाईनही दिली आहे. ‘जन गण सबका शासन’ या जाहिरातीत हे सांगण्यात आलं की आता बिहारमध्ये कुणाचं सरकार येईल. बिहार विकासायोग्य आहे आणि इथे विकास होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

Related Stories

आमदाराच्या हत्येच्या कटाचा व्हिडिओ व्हायरल

Patil_p

तणावावर रामबाण सिंगोनियम वनस्पती

Patil_p

‘आयुष्यमान भारत’ योजनेतील घोटाळा उघड

prashant_c

“…तर डोळे फोडून हात कापून टाकू;” भाजपा खासदाराने काँग्रेस नेत्यांना धमकावलं

Abhijeet Shinde

मास्क लावूनच घराबाहेर पडा

Patil_p

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी केंद्राची नवी नियमावली जारी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!