ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नितीन सरकारने शनिवारी शिक्षकांच्या वेतेनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


या अंतर्गत बिहार शिक्षा विभागाने पंचायत राज आणि शहरी स्थानिक संस्थांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक आणि ग्रंथपालांच्या पगारामध्ये 15 टक्के वाढ करण्यात येणार आहे.
ही पगार वाढ एप्रिल 2021 मध्ये सुरू होणाऱ्या सत्रापासून केली जाणार आहे.