Tarun Bharat

बिहार निवडणूक : तिकीट घेण्यासाठी आलेल्या नेत्याच्या गाडीतून 75 लाखांची रोकड जप्त

ऑनलाईन टीम / पटना : 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील नामांकनासाठी अधिसूचना जारी केली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची नावे जाहीर केलेली नाहीत. तरी देखील 75 लाख रुपये घेऊन तिकीट  घेण्यासाठी सासारामचे संजय सिंह पाटण्यात पोहचले. पोलिसांनी छापमारी करत त्यांच्या गाडीतून 75 लाख रुपये जप्त केले असून, सिंह सध्या फरार आहेत. 

बिहार पोलिसांनी बिस्कोमजवळ केलेल्या छापमारीत सिंह यांच्या फॉर्च्युनर गाडीत 208 असेम्ब्ली सासाराम असे लिहिलेला बायोडाटाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर सिंह घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गांधी मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

फरार झालेल्या सिंह यांच्या सासाराम येथील घरीही पोलीस पोहचली. मात्र, सिंह यांना अगोदर पोलीस येणार असल्याची खबर होती. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. पोलिसांनी त्यांच्या घरावर पोस्टर लावून 24 तासात गांधी मैदान पोलीस स्टेशनमध्ये जबाब देण्यास सांगितले आहे. दरम्यान, पाटण्याच्या पोलीस अधीक्षक उपेंद्र शर्मा यांनी आयकर विभागाला यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच आयकर विभाग पोलिसांनी जप्त केलेली रक्कम ताब्यात घेईल.

Related Stories

भारताच्या अफगाणिस्ताला साहाय्यावर पाकिस्तानच्या अटी

Patil_p

तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत

Patil_p

‘सीबीएसई’चे वेळापत्रक मंगळवारी जाहीर होणार

Amit Kulkarni

कॉमेडियन राजू श्रीवास्तवब्रेनडेड स्थितीत : प्रकृती चिंताजनक

Amit Kulkarni

महिमा चौधरींकडून भाजपचा प्रचार

Patil_p

श्रद्धा हत्याकांडात नवा खुलासा, हत्येनंतर आफताबने मुंबईहून मागवले 37 बॉक्स

datta jadhav