Tarun Bharat

बिहार : भाजप प्रवक्ते डॉ. शमशी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार

 ऑनलाईन टीम / मुंगेर : 


बिहारमधील मुंगेर भागातून एक मोठी घटना समोर आली आहे. माहितीनुसार भाजपचे प्रवक्ते डॉ. अजफर शमशी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळी मारण्यात आली. ही घटना साधारण 11.27 च्या सुमारास घडली. 


शमशी यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून लवकरच त्यांना पुढील उपचारासाठी पटण्याला नेण्याची शक्यता आहे. 


शमशी यांना एक गोळी लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी आरोपींना लवकरात लवकर लवकर अटक करण्याची मगणी केली आहे. 


शमशी हे प्रोफेसर आहेत. घटनेच्या वेळी ते आपल्या गाडीने कासाठी जात होते. कॉलेजमध्ये पोहोचताच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी तिथेच पार्क करण्यास सांगितले. त्याच वेळी दोन गोळ्या झाडल्या. त्याबरोबरच शमशी हे जमिनीवरच कोसळले. दोन पैकी एक गोळी शमशी यांना लागली. घटनास्थळी पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. 

Related Stories

‘मी मोदींचा हनुमान’ : चिराग पासवान

Patil_p

प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. अग्रवाल यांचे निधन

Patil_p

जेएनपीटी बंदरातून 290 किलो हेरॉईन जप्त

datta jadhav

चीनमध्ये १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

Abhijeet Khandekar

मध्य प्रदेश : गेल्या चोवीस तासात 270 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 5735

Omkar B

ओडिशा विधानसभेत भाजप आमदाराचा सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav