Tarun Bharat

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 30 हजार CRPF जवान

ऑनलाईन टीम / पटना : 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव बलाच्या 300 तुकड्या म्हणजेच 30 हजार जवान तैनात करण्याचे आदेश केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला दिले आहेत. 

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. निवडणुकीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. 243 जागांपैकी जदयू 104 आणि भाजप 100 जागांवर उमेदवार उभेकरणार आहे. तर चिराग पासवान यांच्या ‘लोजपा’ला 30, जीतनराम मांझी यांच्या पक्षाला चार, तर उपेंद्र कुशवाह यांच्या ‘रालोसपा’ला पाच जागा सोडण्यातआल्या आहेत. 

28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात मतदान होईल. 3 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात 94 तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात 78 मतदारसंघात मतदान होणार आहे. 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

Related Stories

अखिलेश यांचे निकटवर्ती ‘प्राप्तिकर’च्या रडारवर

Patil_p

शेतकरी आंदोलनावरून संसदेत गदारोळ

Patil_p

प्रत्यक्ष कर संकलन 14.71 लाख कोटींवर

Amit Kulkarni

सोमवारी राज्यात 3,648 नवे रुग्ण

Patil_p

‘ते’ राज्यपालांचे वैयक्तिक मत; मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

datta jadhav

Friendship Day: शिवसेना वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं- शहाजी पाटील

Abhijeet Khandekar