Tarun Bharat

बिहार विधान परिषदेवर जाणार शहनवाझ हुसैन

Advertisements

पाटणा

 भाजपने माजी केंद्रीय मंत्री शहनवाझ हुसैन यांना बिहारमध्ये विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांच्याकडून शनिवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बिहारमध्ये दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून दोन्ही भाजपच्या कोटय़ातील आहेत. यातील एक जागा सुशील मोदी राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेल्याने रिक्त झाली आहे. तर दुसरी जागा विनोद कुमार झा आमदार झाल्याने रिक्त झाली होती. राज्यातील आमदारांची संख्या पाहता 28 जानेवारी रोजी होणाऱया निवडणुकीत भाजपला एक जागा गमवावू लागते.

तर उत्तरप्रदेशात विधान परिषदेच्या 12 जागांवर निवडणूक होणार आहे. यातील 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कुंवर मानवेंद्र सिंग, गोविंद नारायण शुक्ला, सलिल बिश्नोई, अश्वनी त्यागी, धर्मवीर प्रजापति आणि सुरेंद्र चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

Related Stories

इस्रो हेरगिरी प्रकरणी सीबीआयने कारवाई करावी

Patil_p

ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीत वाढ

Amit Kulkarni

केरळमध्ये भूस्खलन; 13 जणांचा मृत्यू

datta jadhav

जास्त सिमकार्ड असतील तर सेवा होणार बंद; दूरसंचार विभागाचे आदेश जरी

Archana Banage

युक्रेन संकटावर भारताच्या ‘भूमिके’चे रशियाने केले स्वागत

Abhijeet Khandekar

आता घरोघरी रात्रं-दिवस फडकवता येणार राष्ट्रध्वज

Patil_p
error: Content is protected !!