Advertisements
बेंगळूर : जर्मन लक्झरी कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूची ‘ग्रॅन कुपे’ प्रकारातील कार भारतात नुकतीच लाँच करण्यात आली. या कारची किंमत 43.5 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी असणार आहे. नवी ‘220 आय ब्लॅक आय शॅडोव’ नावाची कार ही चेन्नईतील कंपनीच्या कारखान्यात तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 2 लिटर, फोर सिलेंडर पेट्रोल इंजिनची जोड या गाडीला असेल. आरामदायी वाहन चालवण्याचा अनुभव घेण्याची संधी ग्राहकांना प्राप्त होणार आहे.