नवी दिल्ली : जर्मनीतील ऑटो क्षेत्रातील कंपनी बीएमडब्ल्यू गुपची नवी ‘बीएमडब्ल्यू 220 आय स्पोर्ट’ ही कार नुकतीच बाजारात दाखल करण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर या गाडीची निर्मिती चेन्नईतील कारखान्यात कंपनीने केली असल्याचे सांगण्यात येते. या गाडीची किंमत 37.9 लाख रुपये इतकी सुरूवातीची सवलतीतील असणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही गाडी खरेदीसाठी आकर्षक वित्तयोजनाही कंपनीने सादर केली असून ग्राहकांकरीता गाडी सर्व्हिसिंगसाठी 3 आणि 10 वर्षाचे पॅकेजही घोषित केले आहे.


previous post