Tarun Bharat

‘बीएसएफ’ने उधळला शस्त्र तस्करीचा प्रयत्न

भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रकाराचा पर्दाफाश

चंदीगढ

 भारत-पाकिस्तान सीमेवर पंजाबमधील फिरोजपूर जिल्हय़ातील अबोहर येथे बीएसएफकडून एक शस्त्र तस्करीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात बीएसएफच्या जवानांना यश आले आहे. बीएसएफच्या जवानांनी या कारवाईत सहा मॅगझिन व 91 राऊंडसह तीन एके-47 रायफल्स, चार मॅगझिन व 57 राऊंडसह दोन एम-16 रायफल्स, चार मॅगझिन व 20 राऊंडसह दोन पिस्तुले इत्यादी शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

भारतीय सुरक्षा संस्थाबरोबरच गुप्तचर संस्थांसमोर गुन्हेगारी व दहशतवादाचे एक नवे रुप आले आहे. भारतीय सैन्य व गुप्तचर संस्थांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तान, आयएसआय व दहशतवादी संघटनांना आपल्या कारवाया करण्यात अपयश येत आहे. यामुळे आता आयएसआय व दहशतवादी संघटनांनी भारतातील गुन्हेगारी जगताचा यासाठी वापर करणे सुरू केले आहे. देशात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आता स्थानिक गँगस्टर्सवर जबाबदारी सोपवली जात असल्याचे दिसून येत आहे. शस्त्र तस्करीचा संबंध या दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी देखील असण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.

Related Stories

33 ते 37 पैशांनी इंधन दरात वाढ

Amit Kulkarni

राजस्थानचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

देशद्रोह कायद्याच्या पुनर्विचाराची केंद्राला अनुमती

Patil_p

दमणमध्ये आता कोरोनाचा शिरकाव

Tousif Mujawar

दहा लाख भाविकांना हज यात्रेची अनुमती

Patil_p

अंदमानच्या बेटांना मिळणार परमवीर चक्र विजेत्यांचे नाव

Patil_p