Tarun Bharat

बीड जिल्ह्यात उद्यापासून पुन्हा लॉक डाऊन

Advertisements

ऑनलाईन टीम / बीड : 


बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी बीडसह सहा शहरात पुन्हा एकदा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. बीड, आंबेजोगाई, परळी, आष्टी, माजगाव आणि केजी शहरात उद्यापासून म्हणजेच 11 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 21 ऑगस्ट पर्यंत पूर्ण बंद असणार आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखराव यांनी दिले. 


ते म्हणाले,  कोरोना रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः शहरामधून फैलाव होण्याची शक्यता अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत शहरातील फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील. 


पालकमंत्री धनजंय मुंडे म्हणाले, बीडमध्ये व्यापाऱ्यांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. आधार पण रोखण्यासाठी भोईर सहा शहरांमध्ये 10 दिवसांसाठी लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, तसेच सुरक्षित वरच्या नियमांचे प्रत्येक ठिकाणी काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले आहे. 

Related Stories

कोल्हापूरसह पंधरा जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार

Archana Banage

मोरोपंत पिंगळे यांचे जीवनकार्य राष्ट्र कार्यासाठी प्रेरणादायी : गिरीश प्रभुणे

Tousif Mujawar

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी;ट्विट करत दिली माहिती

Abhijeet Khandekar

केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत देणार : कृषी मंत्री दादा भुसे

Archana Banage

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

Archana Banage

महाराष्ट्रातील ‘डेल्टा प्लस’च्या रुग्ण संख्येत झाली वाढ

Tousif Mujawar
error: Content is protected !!