Tarun Bharat

बीड शेड येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीकडून रास्ता रोको

प्रतिनिधी / कसबा बीड


करवीर तालुक्यातील बीड शेड येथे दि. २६ रोजी मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको केल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे यांनी स्पष्ट केले. आज देशात सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचा मोदी सरकारला असणारा तीव्र विरोध. काही शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन थेट दिल्लीमध्ये जाणार असल्याने सरकारने हे होणारे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदी पुणे बेंगलोर हायवे, हळदी, मुदाळतिट्टा, सांगरूळ फाटा, बीड शेड व मलकापूर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले आहे.

या आंदोलनावेळी पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते व गोकुळ संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, वीर्शैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शेतकरी वर्ग यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Related Stories

Kolhapur : शिवसेनेचे राजाराम सुतार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Abhijeet Khandekar

शिवाजी विद्यापीठ अधिविभागांची पहिली प्रवेशफेरी बुधवारपासून

Archana Banage

अद्ययावत सुविधांद्वारे कोविड केअर, हेल्थ सेंटर सज्ज ठेवा : जिल्हाधिकारी

Archana Banage

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला

Archana Banage

शासकीय वैद्यकीय अधिकाऱयांचे गुरूवारपासून काम बंद आंदोलन

Archana Banage

उजळाईवाडीत भाजी विक्रेत्याची महिलांकडून धुलाई

Archana Banage