Tarun Bharat

बीपीएल कार्ड वितरणाला कधी सुरुवात?

सर्वसामान्य जनता कार्डच्या प्रतीक्षेत : वैद्यकीय सुविधांपासून अनेकजण वंचित

प्रतिनिधी /बेळगाव

बीपीएल रेशनकार्ड धारकाला वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात. त्यामुळे अनेक जण बीपीएल कार्डसाठी धावाधाव करत आहेत. अनेक गरिबांना अचानक शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. मात्र सरकारने बीपीएल कार्ड देण्याचे सध्या तरी बंद केले आहे. जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून ही कार्डे देण्याचे काम बंद केल्याने समस्या निर्माण झाली आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी काही जणांना कार्डे दिल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र अनेक जण बीपीएल कार्डपासून वंचित राहिले असून त्यांना मोठी समस्या भेडसावत आहे. बऱयाच जणांचे एपीएल कार्ड सध्या सुरू आहे. ते कार्ड ऑनलाईनद्वारे बंद केल्याशिवाय बीपीएल कार्ड मिळणे कठीण झाले आहे. मात्र ऑनलाईनद्वारे कार्ड बंद करणेही थांबविण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना मोठी समस्या भेडसावत आहे.

केवळ रेशनकार्डसाठीच नाही तर वैद्यकीय सेवा घेण्यासाठी अनेकांना बीपीएल कार्डची नितांत गरज आहे. गेल्या 8 महिन्यांत 90 जणांना बीपीएलकार्ड दिल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांच्याकडून वैद्यकीय रिपोर्ट घेऊन तो बेंगळूरला पाठवून त्यांना त्यानंतर कार्ड दिले जात आहे. अन्न आणि नागरी पुरवठामधील कर्मचारी वैद्यकीय सेवेसाठी कार्ड देत असले तरी सर्वसामान्य जनतेला मात्र मोठय़ा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा बीपीएल किंवा एपीएल कार्ड देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

राज्य सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन रेशनकार्ड वितरणाची व्यवस्था सुरू करणे महत्त्वाचे आहे. जवळपास 24 हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. ते बीपीएल कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. तेंव्हा तातडीने बीपीएल कार्ड मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

Related Stories

आजपासून प्राथमिक शाळांमध्ये वाढणार किलबिलाट

Amit Kulkarni

वकिलांसाठी गुरुवारी मेगा लसीकरण मोहीम

Amit Kulkarni

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या एसएसएलसी व्याख्यानमालेला प्रारंभ

Amit Kulkarni

मध्यवर्ती बसस्थानकात समस्यांचा डोंगर

Amit Kulkarni

शाळांमध्ये राबवणार सेवा दिवस, अनुभव दिवस

Amit Kulkarni

50 वर्षांपूर्वीच्या मित्रांनी दिला आठवणींना उजाळा

Omkar B