Tarun Bharat

बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्यांना मोफत तांदूळ पुरवठा

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनच्या काळात बीपीएल रेशनकार्डधारकांना वाढीव रेशनपुरवठा करण्यात येत आहे. एपीएल कार्डधारकांना पूर्वीप्रमाणेच 15 रुपये किलोप्रमाणे 10 किलो तांदूळ देण्यात येत आहे. आता बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्या नागरिकांनाही 10 किलो मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात येत आहे. शनिवारपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. मात्र, मे 2019 पासून आतापर्यंत बीपीएल कार्डासाठी अर्ज केलेल्या नागरिकांनाच याचा लाभ मिळणार आहे.

बीपीएल रेशनकार्डासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज केलेली प्रत, आधारकार्ड आणि मोबाईलसह अर्जावर नमूद केलेल्या रेशन दुकानात जाऊन 10 किलो तांदूळ मोफत घेता येणार आहे. मोबाईलवर येणाऱया ओटीपी क्रमांकाची नोंद घेऊन कार्डधारकांना तांदूळ देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे एपीएल कार्डधारकांनाही मोफत आहार पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, 15 रुपये किलोप्रमाणेच त्यांना 10 किलो तांदूळ देण्यात येत आहे. मे 2019 पासून आतापर्यंत बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना 10 किलो तांदूळ मोफत वाटप सुरू करण्यात आले आहे. एप्रिल, मे व जून असे तीन महिने या कार्डधारकांना तांदूळ मिळणार आहे. कार्डधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

वडगाव येथील मंगाईदेवीची आज यात्रा

Amit Kulkarni

बँक खात्यावरील रक्कम लाटणाऱयाभामटय़ांना अटक

Amit Kulkarni

कुडलसंगम पूजावनात चंदन झाडांची चोरी

Patil_p

राधिका ज्युल्या यांना तीन सुवर्णपदके

Amit Kulkarni

खासगी इस्पितळांना नोंदणीचे आवाहन

Amit Kulkarni

उत्तरप्रदेशमधील ‘त्या’ घटनेचा बेळगावात निषेध

Patil_p