Tarun Bharat

बीपीसीएलचा नफा झाला दुप्पट

Advertisements

नवी दिल्ली

 सरकारी पेट्रोलियम कंपनी बीपीसीएलचा (भारत पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड) चालू आर्थिक वर्षातील जूनअखेरच्या तिमाहीतील निव्वळ नफा दुप्पट नोंदवला गेला आहे. कंपनीचा यंदाचा निव्वळ नफा 2 हजार 076.17 कोटी रुपये नोंदवला गेला असून मागच्या वर्षी याच कालावधीत नफा 1 हजार 075.12 कोटी रुपये होता. कंपनीने साठवणूक केलेल्या कच्च्या तेलातून नफा दुप्पट मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे इंधन विक्री बऱयापैकी प्रभावीत झाली आहे.  इंधन मागणी घटल्याने कंपनीने 75.3 लाख टन इंधनाची विक्री केली आहे. मागच्या वर्षी तिमाहीत कंपनीने 111 लाख टन इंधनाची विक्री केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इंधन विक्रीवर यंदा मोठा परिणाम जाणवला आहे. पण दुसरीकडे कंपनीच्या एलपीजी विक्रीत मात्र 10 टक्के वाढ दिसून आली. कच्चे तेल व पेट्रोलियम उत्पादनांची मागणी घटल्याने किंमतीवर त्याचा परिणाम दिसतोय.

Related Stories

इन्फोसिसला 5 हजार कोटींचा नफा

Patil_p

हय़ुंडाई आणणार 6 इलेक्ट्रिक कार्स,

Patil_p

गोदरेज कन्झ्यूमरला 358 कोटांचा नफा

Patil_p

आगामी सहा महिने बँकांचा संप नाही?

Patil_p

आल्टो 16 व्या वर्षीही बेस्ट कार

Patil_p

आयटी कंपन्यांकडून 4.5 लाख जणांना मिळणार रोजगार

Patil_p
error: Content is protected !!