Tarun Bharat

बुंदेस्लिगा फुटबॉलची आज पुनर्सुरुवात

Advertisements

प्रेक्षकांशिवाय बंदिस्त स्टेडियममध्ये सामने होणार, खेळाडूंवरही निर्बंध

वृत्तसंस्था/ बर्लिन

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यापैकी जर्मनीतील बुंदेस्लिगा फुटबॉल लीग एक असून शनिवारपासून त्याची पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. महामारीच्या काळातही फुटबॉल सुरू करणारी ही पहिली लीग आहे. मात्र यातील सामने बंदिस्त स्टेडियमममध्ये आणि खेळाडूंवरील काही निर्बंधासह खेळविले जाणार आहेत. फुटबॉलपासून वंचित राहिलेल्या जगभरातील शौकिनांसाठी ही एक पर्वणीच ठरणार असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.

दरवेळच्या रिवाजाप्रमाणे यावेळी खेळाडूंना छोटी मुले मैदानात घेऊन येणार नाहीत, प्रतिस्पर्धी खेळाडू सामन्याआधी टनेलमध्ये एकमेकांशी हस्तांदोलन करणार नाहीत, रेफरी, पदाधिकाऱयांशी हस्तांदोलन नाही आणि राखीव खेळाडूंनी मास्क लावून एकमेकांपासून अंतर सुरक्षित अंतर ठेवून बसणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोल नोंदवल्यानंतर जोरदार सिलेब्रेशन करणेही खेळाडूंना टाळावे लागणार आहे. प्रशिक्षकांना आपल्या खेळाडूंना सामना सुरू असताना ओरडून सूचना कराव्या लागतात, यासाठी त्यांना मास्क काढण्याची मुभा असेल. मात्र यासाठी त्यांना किमान 1.5 मीटर अंतर ठेवावे लागेल. सामन्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती राहणार नसली तरी त्या वातावरणाची भरपाई करण्याची शक्कल काढण्यात आली आहे. स्काय टीव्हीने चाहत्यांचा आभास निर्माण करण्यासाठी प्रेक्षकांचा आवाज, चाहत्यांचा जल्लोष, गाणे म्हणणे आणि त्यांच्या प्रतिक्रिया यांचे पूर्वध्वनिमुद्रण प्रक्षेपणावेळी ऐकवले जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय प्रेक्षागारात समर्थकांचे कटआऊट्स प्रेक्षकांचा आभास निर्माण करण्यासाठी खुर्च्यावर ठेवले जाणार आहेत.

कोरोनाबाधितांचे प्रमाण काहीसे कमी झाल्यामुळे 6 मे रोजी चान्सेलर अँजेला मर्केल यांनी फुटबॉल मोसमाची पुनर्सुरुवात करण्याची परवानगी दिल्याचे जाहीर केले होते. 11 मार्च रोजी या स्पर्धेतील शेवटचा सामना झाला होता. त्यात बोरुसिया माँचेनग्लाडबाचने कोलॉन संघाचा 2-1 असा पराभव केला होता. जूनअखेरपर्यंत मोसम संपवण्याचा त्यांचा विचार असून अजून 9 सामने बाकी राहिले आहेत. शनिवारी बोरुसिया डॉर्टमंड व शॅल्क यांची लढत रुहर येथे तर रविवारी बायर्न म्युनिच व युनियन बर्लिन यांच्यासह अन्य लढतीही होणार आहेत. 

Related Stories

एफसी गोवाची जमशेदपूरवर मात, इगोर अँग्युलोचे दोन गोल

Omkar B

न्यूझीलंडकडून बांगलादेशचा ‘व्हाईटवॉश’

Amit Kulkarni

लांब उडीत नयना जेम्सला जेतेपद

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला पराभव

Patil_p

केनिन-स्वायटेक यांच्यात आज जेतेपदाची लढत

Patil_p

सेना ‘विराट’, धावा मात्र फक्त ७८!

Patil_p
error: Content is protected !!