Tarun Bharat

बुंदेस्लीगा स्पर्धेतील विक्रमाशी लेवान्डोवस्कीची बरोबरी

वृत्तसंस्था/ बर्लीन

जर्मनीत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱया बुंदेस्लीगा फुटबॉल स्पर्धेत  बायर्न म्युनिच संघाकडून खेळणाऱया रॉबर्ट लेवान्डोवस्कीने यापूर्वी जर्मनीचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू गेरार्द मुल्लेरचा 49 वर्षे अबाधित राहिलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. या स्पर्धेत मुल्लेरने सर्वाधिक म्हणजे वैयक्तिक 40 गोलांचा विक्रम केला होता. आता लेवान्डोवस्कीने मुल्लेरच्या या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

शनिवारी या स्पर्धेतील बायर्न म्युनिच आणि फ्रीबर्ग यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात 26 व्या मिनिटाला लेवान्डोवस्कीने पेनल्टीवर बायर्न म्युनिचतर्फे गोल नोंदविला. या स्पर्धेतील लेवान्डोवस्कीचा 40 वा गोल ठरला. 1971-72 या कालावधीत जर्मनीच्या मुल्लेरने या स्पर्धेत 34 सामन्यात 40 गोल नोंदविले होते तर लेवान्डोवस्कीने या स्पर्धेत 28 सामन्यात 40 गोल नोंदविले आहेत.

Related Stories

महिला प्रो हॉकी लीग : भारताचे नेतृत्व सविताकडे

Patil_p

ऍथलिट नवज्योत धिल्लाँवर तीन वर्षांची बंदी

Patil_p

अनंत चोपडे, शिवा थापा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

देवेंद्र, निमिशा यांना सुवर्णपदके

Amit Kulkarni

इंग्लंड-भारत डे-नाईट कसोटी अहमदाबादमध्ये

Patil_p

केन विल्यम्सन हैदराबादचा नवा कर्णधार

Patil_p