Tarun Bharat

बुडाला आम्ही कदापीही जमीन देणार नाही

प्रतिनिधी / बेळगाव :

कणबर्गी येथील शेतकऱयांच्या जमिनी विविध उद्योग व्यवसायासाठी तसेच रहिवासी कॉलनी बांधण्यासाठी घेण्यात आल्या आहेत. विविध कारणांसाठी शेतकऱयांच्या जमिनी बुडाने घेतल्या आहेत. पुन्हा आता योजना क्रमांक 61 साठी शेतकऱयांच्या जमिनी घेण्यासाठी आटापिटा सुरु आहे. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत बुडाला जमिनी देणार नाही, असे कणबर्गी येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहे.

जवळपास 25 एकर जमीन शेतकऱयांची बुडा ताब्यात घेणार होती. मात्र त्याविरोधात शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. असे असताना देखील शेतकऱयांच्या या जमिनी घेण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र आम्ही या जमिनी देणार नाही, असे यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सांगण्यात आले.

बुडा कार्यालयात याबाबत शेतकऱयांची बैठक घेण्यात आली. त्याठिकाणीही शेतकऱयांनी जमीनी देण्यास विरोध दर्शविला होता. तरी देखील शेतकऱयांना अधिक नुकसान भरपाई देवू, असे आमिष दाखवून त्या जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र हा प्रयत्न थांबवावा, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिध्देश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बबन मालाई, उपाध्यक्ष भवानी मालाई, कृष्णा अष्टेकर, नारायण अष्टेकर, रामा दसकी, महादेव मालाई, पुंडलिक अष्टेकर, उमेश हलगेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

किमती भेटवस्तू देण्याच्या आमिषाने वृद्धाला 5 लाखाचा गंडा

Patil_p

गोवावेस बसवेश्वर सर्कलमध्ये साचले पावसाचे पाणी

Amit Kulkarni

बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

अनगोळ मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करा

Amit Kulkarni

मण्णीकेरी येथील जवानाचे नाशिक येथे निधन

Patil_p

शेतकऱयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Patil_p