स्पीलीमबर्गो (इटली) : इटलीमध्ये झालेल्या 19 व्या स्पिलीमबर्गो खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद भारताचा युवा ग्रॅण्ड मास्टर रोनक साधवानीने पटकाविले. या स्पर्धेत साधवानीने 9 फेऱयामध्ये 7 गुण घेत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. 15 वर्षीय रोनक साधवानी (एलो रेटिंग 2579) याने दर्जेदार कामगिरी करत शेवटपर्यंत या स्पर्धेत एकही डाव गमविला नाही. त्याने या स्पर्धेत 5 डाव जिंकले असून 4 डाव बरोबरीत राखले. चौथ्या मानांकित साधवानीला या स्पर्धेमध्ये 5 विविध ग्रॅण्ड मास्टरशी लढत द्यावी लागली. साधवानीने पोलंडच्या ग्रॅण्ड मास्टर ऑस्कर विझोरेकचा एका डावात पराभव केला तर इटलीच्या कॅपेलिटो, हंगेरीचा पेस्टी, इटलीचा लोडीशी आणि फ्रान्सचा ट्रेव्हडन यांच्यावरही विजय मिळविले.


previous post
next post