Tarun Bharat

बुधवारी जिल्हय़ात उच्चांकी 757 नवे रुग्ण

बेळगाव तालुक्मयातील 359 जणांचा समावेश ; सक्रिय रुग्णसंख्या अडीच हजारांच्या घरात

प्रतिनिधी / बेळगाव

बुधवारी आजवरच्या उच्चांकी 757 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही धक्काच बसला असून सक्रिय रुग्णसंख्या अडीच हजारांच्या घरात पोहोचली आहे. एका बेळगाव तालुक्मयात 359 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 12 हजार 560 जणांचा अहवाल यायचा आहे. 2 हजार 433 हून अधिक सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत असून 58 हजार 122 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 6 लाख 82 हजार 72 जणांची स्वॅब तपासणी केली असून 6 लाख 34 हजार 439 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

अलतगा, मच्छे, बाळेकुंद्री, बस्तवाड, देसूर, पिरनवाडी, गणेशपूर, शिंदोळी, सुळेभावी, हलगीमर्डी, हिंडलगा, हिरेबागेवाडी, होनगा, हुदली, काकती, मुत्नाळ, धामणे, कलारकोप्प, कंग्राळी बी. के., कंग्राळी खुर्द, हलगा, मच्छे, सांबरा, मारिहाळ,  पंतबाळेकुंद्री, वंटमुरी, के. के. कोप्प, सरस्वतीनगर, मुतगा, येळ्ळूर, अळवाण गल्ली-शहापूर, अमननगर, अनगोळ, अन्नपूर्णावाडी, अंजनेयनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अशोकनगर, ऑटोनगर, आझमनगर, बसव कॉलनी, बसवणकुडची, भाग्यनगर, बिम्स क्वॉर्टर्स, कॅम्प, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, शाहूनगर, सहय़ाद्रीनगर, संभाजीनगर-वडगाव, संगमेश्वरनगर, काकतीवेस रोड, सरस्वतीनगर, शहापूर, शास्त्राrनगर, शिंदोळी क्रॉस, शिवबसवनगर, शिवाजी कॉलनी, शिवाजीनगर, श्रीनगर, हिंदवाडी, तानाजी गल्ली, मंगाईनगर-वडगाव, मार्कंडेयनगर, नानावाडी, नेहरुनगर, ओमनगर, पांगुळ गल्ली, रामतीर्थनगर, टी. व्ही. सेंटर, वीरभद्रनगर, विनायकनगर, भाग्यनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हिंडाल्को कॉलनी, हालभावी येथील आयटीबीपी, सांबरा येथील एटीएसमध्येही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कुवेंपूनगर, लक्ष्मी टेकडी, अशोकनगर, महालक्ष्मीनगर, महांतेशनगर, माळी गल्ली, मजगाव, चव्हाट गल्ली, क्लब रोड, गोवावेस, गोंधळी गल्ली, गुडस्शेड रोड, हनुमाननगर, हिंदवाडी आदी शहरातील विविध भागात रुग्ण आढळून आले आहेत. खासकरून टिळकवाडी, सदाशिवनगर, महांतेशनगर परिसरात रुग्णसंख्या वाढती आहे.

Related Stories

बहावा बहरला… पीक पाणीही बहरणार

Omkar B

ढगाळ वातावरण कायम…

Omkar B

स्वामी विवेकानंद सोसायटीने सभासदांच्या विश्वासावर साधली प्रगती

Amit Kulkarni

‘अग्निपथ’ योजना त्वरित मागे घ्या

Amit Kulkarni

‘त्या’ मठाधीशांवर कारवाई करा

Patil_p

मध्यरात्री शेतवडीत ट्रक क्लिनरचा खून

Patil_p