Tarun Bharat

बुधवार दि. 12 मे ते मंगळवार दि. 18 मे 2021

Advertisements

अष्टम गुरुविषयी असलेले समज-गैरसमज

अष्टम गुरु आलेला आहे, आता काय करावे? अष्टम गुरु म्हणजे मृत्यूसम पीडा, अशी समजूत आहे. पण त्याची कारणे मात्र कुणी शोधत नाहीत. साडेसातीला जसे लोक घाबरतात, तसेच अष्टम गुरुलाही घाबरतात. वास्तविक पाहता गुरु हा मुळातच अत्यंत शुभ व मंगलमय ग्रह मांनलेला आहे. तो कुणाचेही कधीही वाईट करत नाही. कुंडलीतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान आहे. या घरावर शनि आणि मंगळ याचा प्रभाव असतो. हे स्थान मृत्यू व तत्सम संकटांचे घर असल्याने व गुरु हा देवांचा गुरु बृहस्पति असल्याने या घरात असलेला गुरु म्हणजे मृत्यू व मोठय़ा संकटाच्या वेळी मिळणारी दैवी मदत असते. या गुरुमुळे पित्याचा उत्कर्ष होईल किंवा तो रसातळाला तरी जाईल. या गुरुमुळे जंगले, राने-वने किंवा कचऱयातून देखील सोने निर्माण करण्याची धमक असू शकते. प्रचंड संपत्ती, श्रीमंती देण्याची कुवत या गुरुमध्ये असते. पण कमाई सुरू असली तरी कर्ज मात्र वाढत जाते. रक्ताचे विकार निर्माण होणे, काहीवेळा ठाम निर्णय घेण्यात अडचण येणे, घराण्यातील अकाली मृत्यू किंवा मृत्यूसंकट येण्याची शक्मयता असते. घराण्यातील दोषामुळे वारंवार जन्म घ्यावा लागणे असे काही गुणधर्मही दिसून येतात. अष्टमात शुभ गुरु असेल तर अकाली मृत्यूपासून रक्षण होते. कितीही गंभीर आजार असले तरी त्यातून मार्ग निघतो. काहीवेळा सासरकडून मोठय़ा प्रमाणात संपत्ती मिळण्याची शक्मयता असते. तुमच्याकडे पैसा असेल नसेल पण सर्व तऱहेचे सुख अशा लोकांना मिळू शकते. जर एखाद्या गंभीर रुग्णाच्या शेजारी अष्टमात गुरु असलेली व्यक्ती बसली असेल तर त्या रुग्णाचे मरण काही काळ पुढे जाते. पण त्याला जे आजार किंवा रोग असतात ते यांच्याकडे येतात. त्यासाठी अशा व्यक्तींनी जरा संभाळून राहणे आवश्यक ठरते. घराण्यातील कोणतेही गंभीर दोष अशा व्यक्तीमुळेच समजतात. पण या गुरुचे पावित्र्य भंग झाल्यास चारित्र्य बिघडते. व्यसन वगैरे मागे लागून जिवावरचे प्रसंग येतात. काहीवेळा कर्जबाजारी होण्याची परिस्थिती निर्माण होते. भाग्योदयाला उतरती कळा लागते. रक्तदाब, लठ्ठपणा यासारखे विकार होतात. त्यासाठी अष्टमात गुरु असलेल्या व्यक्तीने सर्व तऱहेने पावित्र्य पाळण्याची गरज आहे. मांसाहार, व्यसन, खोटय़ा साक्षी, चूक नसताना शिक्षा देणे,   एखाद्याची चूक नसूनही पैशाच्या जोरावर त्याला दोषी ठरवणे, निष्कारण बदनाम करणे, कारण नसताना खोटे आरोप करणे असे प्रकार जर घडत असतील तर अष्टम गुरुची अतिशय भयानक फळे मिळतात. अष्टम गुरुची ही प्रदक्षिणा दर 13 वर्षाने प्रत्येकाच्या आयुष्यात येते. त्यामुळे या काळात सर्व सावधगिरी बाळगून वर्तन स्वच्छ ठेवल्यास कोणताही त्रास होत नाही. उलट या अष्टम गुरुमुळे कुबेराचे ऐश्वर्य मिळू शकते.

मेष

 अक्षय तृतीया धनस्थानी आलेली आहे. आर्थिक बाबतीत काहीतरी महत्त्वाच्या घटना घडू शकतील. मोठे आर्थिक व्यवहार असतील तर ते करण्यास हरकत नाही. या काळामध्ये रवि, बुध, शुक्र, राहू असे चार ग्रह धनस्थानी असल्याने कोणतेही व्यवहार सावधानतेने करावेत. एखादी क्षुल्लक चूक देखील मोठी हानी पोचू शकते. मंगळाचे भ्रमण शुभफलदायक आहे. जे काम हाती घ्याल, ते निर्धाराने पूर्ण करू शकाल. प्राप्त परिस्थिती गंभीर असल्याने आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.

वृषभ

 पंचग्रह युतीच्या योगावर अक्षयतृतीया तुमच्या राशीत होत आहे. या रोगावर काही महत्त्वाचे व्यवहार हातावेगळे होऊ शकतात. जे काम कराल ते निश्चित पूर्ण होईल. पण सावधानता न बाळगल्यास नुकसान देखील होऊ शकते. कारण पंचग्रह युती शापित योगात आहे. रविचंद्र अमावस्या योगाचा संपूर्ण महिनाभर परिणाम राहणार आहे. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. कोठेही बेफिकीर राहू नका तसेच सांसर्गिक व्यक्तीपासून दूर राहा.

मिथुन

चार ग्रहांच्या युतीमध्ये बाराव्या स्थानी अक्षयतृतीया येत आहे. फक्त आध्यात्मिक बाबतीत हा योग चांगला आहे. देवधर्म, पूजाअर्चा वगैरे या काळात करू शकता पण फार मोठे आर्थिक व्यवहार, महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करणे, करारमदार, महत्त्वाच्या वाटाघाटी वगैरे करताना सावध राहा. किरकोळ चूक देखील मोठे उत्पात घडवू शकते. या काळात जर सांसर्गिक विकारांचा प्रादुर्भाव झाल्यास तो लवकर कमी होणार नाही. त्यासाठी पथ्यपाणी योग्य ठेवा. सर्व बाबतीत सावध राहा. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. 

कर्क

लाभस्थानी चार महत्त्वाचे ग्रह घेऊन अक्षयतृतीया आली आहे. अशा योगावर कुठेतरी मोठा फायदा होण्याची शक्मयता असते. धनलाभ, वास्तू, वाहन खरेदी-विक्री, मानसिक समाधान, मित्र-मैत्रिणांचे सहकार्य, कर्जफेड यासह अनेक शुभघटना घडू शकतात. पण त्याचबरोबर मुलांच्याकडे लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे. पंचमातील केतू बरोबर नाही. एखाद्या वेळेस मुले बहकण्याची अथवा नको त्या मार्गाला लागण्याची शक्मयता दिसते. शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कोणतीही महत्त्वाची कामे असतील तर या आठवडय़ात करून घ्या.

सिंह  

चार महत्त्वाच्या ग्रहांना घेऊन अक्षयतृतीया दशम स्थानी आली आहे. व्यवसायात काहीतरी महत्त्वाच्या शुभघटना घडतील. बढती, बदली, उच्चपदावर वर्णी लागणे, पूर्वी गेलेली नोकरी परत मिळणे किंवा बंद पडलेला उद्योग व्यवसाय परत सुरु होणे, उधार उसनवार दिलेली रक्कम वसूल होणे, अशा काही गोष्टी अनुभवास येऊ शकतात. त्या दृष्टीने जरूर प्रयत्न करा. चतुर्थातील केतू किरकोळ बाबींवरून कुटुंबात मतभेद वाढेल किंवा निष्कारण गैरसमज निर्माण होतील. त्यासाठी काळजी घ्यावी. तुमच्या कुटुंबातील गुप्तगोष्टी बाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्या.

कन्या

चार ग्रहांसह भाग्यस्थानी अक्षय तृतीया आलेली आहे धार्मिक बाबतीत मोठे यश मिळेल. जप, ध्यानधारणा, अध्यात्म, पूजा, मंगलकार्य या दृष्टीने उत्तम यश देणारी. योग नोकरीविषयक काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. घराण्यातील एखादी व्यक्ती जर हरवलेली असेल तर तिचा पत्ता लागेल. घाईगडबडीत जर कुठे किमती वस्तू अथवा कागदपत्रे हरवले असतील तर ती परत मिळण्याची शक्मयता. नातेवाईक व शेजारी यांच्याशी चुकूनही वादविवाद करू नका.

तूळ  

अष्टमस्थानी चार ग्रह घेऊन अक्षयतृतीया आलेली आहे. आर्थिक बाबतीत हा योग उत्तम आहे. पण आरोग्य व कुटुंबाची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. कोणतेही करारमदार करताना सावध राहा. कुणालाही जामीन राहू नका. क्षणभराचा बेसावधपणा संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरवू शकतो. घशाचे अथवा श्वासाचे विकार असतील तर विशेष दक्ष राहावे लागेल. आर्थिक बाबतीत कशालाही कमी पडणार नसले तरी काही बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे.

वृश्चिक

चार महत्त्वाच्या ग्रहांच्या युतीत सप्तमस्थानी अक्षयतृतीया पडलेली आहे. भागिदारी व्यवसाय असेल तर वाढवा. विवाहाच्या प्रयत्नात तर उत्तम यश मिळेल. एखादे वेळेस सर्वदृष्टीने परिपूर्ण पण आंतरजातीय व आंतरधर्मीय मिळण्याची शक्मयता. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल घडू शकतात. कुठेही बाहेर पडताना वाहन पूर्णपणे तपासूनच बाहेर पडा. किटक, प्राणी अथवा मानवी चुका यामुळे अचानक कुठेतरी गोंधळ होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी सावधानता हा मूलमंत्र समजावा.

धनु

चार महत्त्वाचे ग्रह षडाष्टकात आल्याने नोकरी व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत आशादायक वातावरण तयार होईल. आर्थिक समस्या सुटतील. जी कामे हाती घ्याल ती यशस्वी करून दाखवाल. पण अतिउत्साह व फाजील आत्मविश्वास यांच्या आहारी गेल्यामुळे नको ते संसर्गजन्य रोग तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जास्तीत जास्त सावध राहणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार मात्र सुरळीत चालतील.

मकर

चार महत्त्वाच्या ग्रहांना घेऊन अक्षयतृतीया पंचमस्थानी आलेली आहे. मुलाबाळांच्या   बाबतीत शुभघटना. लग्न, मंगलकार्य, धार्मिक कृत्ये, महत्वाची शांती वगैरे कामात चांगले यश मिळेल. ज्यांच्याकडून अपेक्षा नाही, त्यांच्याकडून मोठे लाभ होऊ शकतील. या आठवडय़ात कोणाच्याही भिडेला बळी पडून आपले वाहन अथवा मोबाईल कुणालाही वापरण्यास देऊ नका. महत्त्वाचे करारमदार, आर्थिक व्यवहार, जागा बदलणे इत्यादी कामासाठी हा आठवडा अनुकूल आहे.

कुंभ

चतुर्थातील चार महत्त्वाचे ग्रह व तेथेच आलेली अक्षयतृतीया वास्तुसंदर्भातील कोणतेही कामात उत्तम यश मिळवून देईल. जागा बदलणे, घर खरेदी-विक्री, वाटाघाटी यासाठी अनुकूल काळ आहे. नोकरी व्यवसायात मात्र काही नको त्या जबाबदाऱया पडतील. किंवा नको त्या ठिकाणी बदली होऊन कामाचा ताण वाढण्याची शक्मयता आहे. भगीरथ प्रयत्न करूनही कामे होत नसतील तर ती आठवडय़ात पूर्ण करून घ्या. कोणत्याही अडचणी येणार नाहीत. पोटाचे आजार व   ऍसिडिटी यापासून जपावे लागेल.

मीन

किती दिवसांनी चार महत्त्वाचे ग्रह घेऊन अक्षयतृतीया आलेली आहे. महत्त्वाचे प्रवास, बोलणी, वाटाघाटी, नातेवाईक अथवा शेजारचे संबंध सुधारणे, गैरसमज कमी होणे, तडजोड, आर्थिक व्यवहारातील घोटाळे उघड होणे असे काही चांगले अनुभव या आठवडय़ात येऊ शकतात. पण जत्रा-यात्रा, संमेलने, महोत्सव अशा ठिकाणी गंभीर अपघात अथवा दुर्घटना होऊ शकतात. काळजी घ्यावी. प्रवासाला जात असाल तर किंमती वस्तूकडे विशेष लक्ष द्या. किरकोळ किंमतीची वस्तू गोड बोलून तुमच्या गळय़ात घालण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या वेळी सावध राहा.

Related Stories

आजचे भविष्य 6-08-2021

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.19 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य बुधवार दि. 1 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 8 फेब्रुवारी 2021

Patil_p
error: Content is protected !!