Tarun Bharat

‘बुल’मध्ये पॅराट्रूपर साकारणार शाहिद

अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘जर्सी’ या स्वतःच्या आगामी चित्रपटावरून चर्चेत आहे. हा चित्रपट 31 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. याचदरम्यान शाहिदच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या चित्रपटात शाहिद अत्यंत वेगळय़ा प्रकारची भूमिका साकारताना दिसून येईल. त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘बुल’ आहे. या ऍक्शन चित्रपटात शाहिद एका पॅराट्रूपरची व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आदित्य निंबाळकर पेलणार आहे.

हा चित्रपट ब्रिगेडियर बुलसारा यांच्या जीवनावर आधारित असून यात सत्य घटना दर्शविण्यात येणार आहेत. या चित्रपटाचा हिस्सा ठरल्याने शाहिद अत्यंत उत्साहित आहे. बुल एक ऍक्शनपॅक चित्रपट ठरणार आहे. स्वतःची अचुकता आणि शौर्यासाठी ओळखल्या जाणाऱया एका पॅराट्रूपरची भूमिका मी साकारणार आहे. या पॅराट्रूपरने ऐतिहासिक आणि निस्वार्थी मोहिमेसाठी स्वतःच्या सहकाऱयांचे नेतृत्व केले होते. एका पॅराट्रूपरची व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे शाहिदने म्हटले आहे. या चित्रपटाची पटकथा असीम अरोडा आणि परवेज शेख यांनी लिहिली आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अमर बुटाला सतेच गरिमा मेहता यांच्याकडून निर्मित या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. चित्रपटातील नायिकेबद्दल अद्याप कुठलीच माहिती समोर आलेली नाही.

Related Stories

अजिंक्य देव होणार बाजीप्रभू

Patil_p

ओटीटीमध्ये ‘लायन्सगेट प्ले’ची एंट्री

Patil_p

नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे…

Patil_p

ओटीटीवर क्रिती सेनन करणार पदार्पपण

Amit Kulkarni

झूलन गोस्वामीच्या व्यक्तिरेखेत अनुष्का शर्मा

Amit Kulkarni

अभिनेत्री यशिका आनंद दुर्घटनेत जखमी

Patil_p