Tarun Bharat

बुलेटची आदलाबदली..आणि मालकांची भंबेरी..!

शाहुवाडी प्रतिनिधी

आठवडा बाजार वाहनांची माणसांची गर्दी आणि यातच लावलेली गाडी आपली बुलट समजून दुसऱ्याचीच बुलट घेऊन गेल्याने गाडी मालकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग पसरले होते; मात्र क्षणातच आपली गाडी परत येताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले की घटना घडली मलकापूरमध्ये शुक्रवारच्या आठवडा बाजार दिवशी.

मलकापूर येथे मंगळवार पेठेच्या वळणावर बुलेट गाडी लावून एक युवक बाजारात खरेदीसाठी गेला होता घाईगडबडीत बाजार खरेदी करून परत आल्यावर गाडी जाग्यावर नसलेली पाहून गाडी मालकाच्या पायाखालची जमिन सरकली.
दुसऱ्याच बुलट मालकांने आपलीच गाडी समजून दुसऱ्याच्या गाडीला किल्ली लावण्याचा प्रयत्न केला, गाडीला किल्ली बसत नाही म्हटल्यावर लॉक नादुरुस्त झाला असेल असे समजून गाडी ढकलत नेली आणि नवीन चावी करून घेतली दुसरा गाडी मालक गाडी जवळ येताच आपली गाडी दिसत नसल्याचे दिसताच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग उमटले आपण लावलेली बुलेट गाडी दुसरीच बुलेट घेऊन जाताच आहे सर्वत्र शोधाशोध झाली अखेर किल्ली बनवून झाल्यानंतर नंबर बघितल्यावर त्या मालकाच्या चटकन लक्षात आलं की आपण गाडी बदलून आणली. अखेर पुन्हा नविन चावी घेऊन मूळ मालकाच्या समोर हजर झाल्याने दोघांचाही चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले. मात्र तीनशे रुपयाची चावी बनवल्याच शल्य मात्र चेहऱ्यावर चांगलेच उमटले होते.

Related Stories

खाते वाटपाबाबत दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण;म्हणाले,पदभार स्वीकारण्यापूर्वी …

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात लम्पीचा धोका वाढला

Kalyani Amanagi

कोल्हापूर : मादळेत आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

काँग्रेसचा ‘हा’ नेता राज्यसभेचा विरोधी पक्षनेता होणार

Archana Banage

शिक्षकाने भावाला ओरडले, मोठ्या भावाने शिक्षकावरच केले कोयत्याने वार

Archana Banage

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने कोरोना विषाणूचा नाश; शास्त्रज्ञांचा दावा

datta jadhav