Tarun Bharat

बुलेटवरून हिंडणारे वृद्ध दांपत्य

चिरतरुण राहणे शिकविणारी जोडी

सैरसपाटा करण्याची हौस असणारा, नवनवी ठिकाणे पाहून जग जाणून घेऊ पाहणारा व्यक्ती मनाने कधीच वृद्ध होत नाही. पांढरे केस, शरीरावरील वार्धक्याच्या खुणा हे वृद्धत्व नाही. वृद्धत्व थांबणे, काही नवे न करणे, स्वतःला आव्हान न देणे असते. अशाच वृद्धत्वावर मात करून बाइकवर स्वार होत ‘शोले’ चित्रपटातील जय-वीरूप्रमाणे प्रवासास निघालेल्या दांपत्याची कथा जाणून घेण्यासारखी आहे.

2011 मध्ये माझी पत्नी लीलाच्या पायात प्रॅक्चर झाले होते आणि मला हार्ट अटॅक. बुलेट पुन्हा चालवायची नाही असे डॉक्टरने बजावले होते. पण त्यांना मी प्रवासावर किती प्रेम करतो याची जाणीव होती. बरा झाल्यावर मी स्वतःला चार भिंतींमध्ये कैद करू शकलो नाही असे वडोदरा येथील मोहनलाल चौहान यांनी म्हटले आहे.

स्वतःचे जीवन वृद्धाप्रमाणे जगू शकत नसल्याचा विचार केला, तेव्हा मी 67 वर्षांचा होतो. स्वतःची 1974 मॉडेल बुलेट काढली आणि नजीकच्या शहरे फिरू लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सैर करणे आवडत होते, पण पत्नी लीलाशिवाय मजा येत नव्हती. ती व्हिलचेअरवर होती. माझ्या बुलेटमागे ती पूर्वीप्रमाणे बसू शकत नव्हती. अशा स्थितीत बुलेटला साइडकार जोडून घेतल्यावर लीला माझ्यासोबत आरामात प्रवास करू शकेल असा विचार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यानंतर एकत्र शॉर्ट ट्रिप करणे सुरू केले. 2016 मध्ये आम्ही मोठा प्रवास केला आणि याकरता एफडी मोडावी लागली. आम्ही महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूत गेलो. आम्ही सलग 3 तास बाईक चालवायचो आणि त्यानंतर विश्रांती घ्यायचो. जेथे थांबावेसे वाटायचे तेथेच थांबायचो असे त्यांनी सांगितले आहे.

प्रतिदिन 4 हजारांचा खर्च

लीला माझी फायनान्स मॅनेजर होती, दिवसाचा खर्च 4 हजार रुपये निश्चित केला होता. लीलाने बुलेटमध्येच एक गुप्त तिजोरी तयार केली होती. ती एक रुपया देखील विनाकारण खर्च करू द्यायची नाही. लीलासोबतच्या प्रवासातील 75 दिवस कसे गेले कळले नाहीत. घरी परतल्यावर पुढील ट्रिपचे प्लॅनिंग सुरू केल्याचे ते सांगतात.

ईशान्य भारताची ट्रिप

फेब्रुवारी 2018 मध्ये ईशान्य भारताची ट्रिप केली, वाटेत भेटलेले सैनिक विचारपूस करायचे. 2020 मध्ये आम्ही 30 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. लीला माझी नेहमीच वीरू राहणार असल्याचे ते सांगतात.

Related Stories

मेदव्हेदेव, सित्सिपस, किज, क्विटोव्हा उपांत्य फेरीत

Patil_p

अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करू नका!

Omkar B

आठ राज्यातील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक

datta jadhav

काश्मिरी पंडितांना घरं सोडण्यास भाग पडलं जातंय; केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

Archana Banage

ओडिशात कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

उत्तराखंडात टोळधाडीची शक्यता; हाय अलर्ट जारी

Tousif Mujawar