Tarun Bharat

बुलेट ट्रेन प्रकल्पाकरता 1500 कोटींची तरतूद

गुजरातचा 2.27 लाख कोटींचा अर्थसंकल्प

वृत्तसंस्था/ गांधीनगर

गुजरातचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री नितिन पटेल यांनी बुधवारी नवव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. यंदा 2.27 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. दोन मेगा टेक्सटाईल पार्क तसेच केवडियानजीकच्या 50 किलोमीटर क्षेत्रात कमळ उद्यानाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी गुजरात सरकारकडून 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अहमदाबाद, गांधीनगर, सूरत मेट्रोसाठी 568 कोटी रुपये यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिक्षणासाठी अर्थसंकल्पाद्वारे 32 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तर सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱयांना 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

केंद्र सरकारप्रमाणेच गुजरात सरकारचा अर्थसंकल्पही कागदरहित आहे. मागील वर्षाप्रमाणेच कागदरहित अर्थसंकल्पाची प्रक्रिया यंदाही राबविण्यात आली आहे.

पण वाचनालय आणि नोंदीसाठी अर्थसंकल्पाच्या 150 प्रतींचे मुद्रण करण्यात येणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली आहे.

मोबाईल ऍप्लिकेशन

अर्थसंकल्पासाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. कागदाच्या बचतीसह तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरासह राज्याच्या कोटय़वधी नागरिकांपर्यंत अर्थसंकल्पाची माहिती पोहोचविण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.

Related Stories

69 हजार पेट्रोल पंपांवर ई-चार्जिंग कियोस्क

Patil_p

सीमेवर शांतता राखण्यावर भारत-चीनमध्ये सहमती

Amit Kulkarni

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांकडून जुन्या वाहनांसाठी धोरण जाहीर

Archana Banage

कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता

Patil_p

मुलांच्या अपयशावर नव्हे प्रयत्नांवर लक्ष द्या

Patil_p

…तर हे भाजपला नक्की महागात पडेल – संजय राऊत

Abhijeet Khandekar