Tarun Bharat

‘बुल्ली बाई’ प्रकरणी तिघांना अटक; तपासाची चक्रे गतीमान

ऑनलाईन टीम / मुंबई

गेले काही दिवस मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने गिटहब प्लॅटफार्मच्या बुली बाई या अॅपची निर्मिती करण्यात आली असून या अॅपद्वारे मुस्लिम महिलांची बदनामी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तीन जणांना अटक करण्यात आली असली तरी नजीकच्या काळात ही संख्या आणखी वाढू शकते, असे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले बुधवारी पत्रकार परिषद घेतली यावेऴी ते बोलत होते.

यावेळी नगराळे यांनी सांगितले की, पकडलेल्यांपैकी दोघे उत्तराखंडमधील असून यामागे अजून काही कट होता का, याचा तपास पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या कोणालाही अटक केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे ही ते यावेळी म्हणाले.

तसेच या प्रकरणाचा तपास हा संवेदनशील स्वरूपाचा असल्याने आम्ही अधिक तपशील सांगू शकणार नाही. तपास ऑनलाइन असल्याने तपशील शेअर केल्याने तपासात अडथळा येऊ शकतो, असे ते म्हणाले. त्यामूळे मुस्लिम महिलांची बदनामी करणाऱ्या या अॅपद्वारे गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी मुंबई पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान केली असल्याचे ही यातून स्पष्ट होते.

Related Stories

अडचणीवर मात करून कामे पूर्ण करण्याचे ठेकेदारापुढे आव्हान.

Patil_p

डिसेंबरमध्ये आणखी 3 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार

datta jadhav

खेडमध्ये तीन महिन्यांत पाचवेळा गावठी हातभट्टय़ांचे तळ उद्ध्वस्त

Amit Kulkarni

इंदोरमध्ये मागील चोवीस तासात 61 नवे रुग्ण, एकूण संख्या 2299, तर 98 मृत्यू

Tousif Mujawar

साताऱ्याला मी अवश्य भेट देईन; राष्ट्रपती मुर्मूंचे आश्वासन

Archana Banage

स्टॅंडअप काॅमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Archana Banage